मीच माझ्या मुलाला जयंत पाटलांच्या भेटीला पाठवलं; अजित पवार गटाच्या नेत्याच्या विधानाने खळबळ
Gokul Zirwal and Jayant Patil Meeting : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार गटाच्या नेत्याने जयंत पाटील यांची भेट घेतली आहे. या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. नाशिकच्या राजकारणात या भेटीची जोरदार चर्चा होत आहे. नेमकं काय घडलं? वाचा सविस्तर...
विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. अशात राज्याच्या राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला आहे. राजकीय नेत्यांच्या गाठीभेटी वाढल्या आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते शरद पवार आणि शरद पवार गटातील वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. नाशिकमधील बड्या नेत्याच्या मुलाने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेतली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
झिरवळ काय म्हणाले?
राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते नरहरी झिरवळ त्यांचे पुत्र गोकुळ यांना दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याच्या तयारीत आहेत. अशातच गोकुळ झिरवळ आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट झाली. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. या भेटीनंतर नरहरी झिरवळ यांनी टीव्ही 9 मराठीशी संवाद साधलात तेव्हा गोकुळ झिरवळ आणि जयंत पाटील यांच्या भेटीवर नरहरी झिरवळ यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. जयंत पाटील यांच्या भेटीसाठी गोकुळला मीच पाठवले होतं. जयंत पाटील माझे नेते आहेत. त्यांचा जाऊन सत्कार कर आशा सूचना दिल्या होत्या, असं नरहरी झिरवळ म्हणालेत.
गोकुळ झिरवळ आणि जयंत पाटील यांची भेट झाल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. गोकुळ झिरवळ हे शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा होत आहे. त्यावर झिरवळांनी प्रतिक्रिया दिली आहे. तिथे त्याला विचारलं बापासारखे त्याच्यात काही गुण आहेत. म्हणून त्याने निवडणूक लढविण्याचं सांगितलं. त्यामुळे संभ्रम तयार झाला. पण आता तो जागेवर आहे आणि कायमस्वरूपी जागेवर राहणार आहे, असंही झिरवळ म्हणालेत.
निवडणुकीआधी झिरवळांची मोर्चेबांधणी
नरहरी झिरवळ माजी आमदार धनराज महाले यांची भेट घेणार आहेत. त्यावरही झिरवळींनी बातचित केली. महायुतीमधील प्रतिस्पर्धी असणाऱ्या माजी आमदार धनराज महाले यांची भेट घेणार आहे. निवडून येण्यासाठी उभे राहणार असाल तर ठीक आहे. मात्र अपक्ष लढून मला अडचणीत आणण्यासाठी निवडणूक लढविणार असाल तर निवडणूक लढवू नका, अशी विनंती मी त्यांना करणार आहे, असं झिरवळ म्हणाले. दिंडोरी विधानसभा मतदारसंघातील अडचणी दूर करण्याचा नरहरी झिरवाळांचा प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी ते त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांच्या भेटीगाठी घेत आहेत.