नरहरी झिरवाळ यांचा धनगर आरक्षणाला विरोध; म्हणाले, आमच्या आरक्षणात यायचा हट्ट का?

राज्यात मराठा आणि ओबीसींचा आरक्षणावरून वाद सुरू असतानाच आता आणखी एक नवा वाद निर्माण झाला आहे. धनगर समाजाने आदिवासींच्या आरक्षणातून आरक्षण मागितलं आहे. त्याला अजितदादा गटाचे नेते नरहरी झिरवाळ यांनी विरोध केला आहे. आमच्या आरक्षणातूनच आरक्षण घेण्याचा अट्टाहास का? असा सवाल झिरवाळ यांनी केला आहे.

नरहरी झिरवाळ यांचा धनगर आरक्षणाला विरोध; म्हणाले, आमच्या आरक्षणात यायचा हट्ट का?
narhari zirwal Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Sep 16, 2024 | 2:37 PM

विधासभा उपाध्यक्ष आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते नरहरी झिरवाळ यांनी धनगर समाजाला आदिवासी आरक्षणातून आरक्षण देण्यास विरोध केला आहे. धनगर समाजाला आरक्षण देण्यास आमची ना नाही. पण आमच्यामधून त्यांना आरक्षण का? धनगर समाजाला आदिवासीतूनच आरक्षण देण्याचा हट्ट का? असा सवाल नरहरी झिरवाळ यांनी केला आहे. मीडियाशी संवाद साधताना त्यांनी हा सवाल केला आहे. झिरवाळ यांच्या या विरोधामुळे आता मराठा-ओबीसी वादानंतर धनगर-आदिवासी वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

वर्षानुवर्षे हा विषय सुरू आहे. धनगर समाजाला आरक्षण द्यावे यावर आमचे दुमत नाही. पण आमच्यातून देऊ नये. आदिवासी आरक्षण हवे हा हट्ट का? आमच्यात आरक्षण हवे हा हट्ट योग्य नाही. कालच्या बैठकीची मला कल्पना दिली नाही, असं नरहरी झिरवाळ म्हणाले.

निर्णयाविरोधात एकत्र येऊ

माझी सरकला विनंती आहे. जसे त्यांना बोलवले जाते तसं आम्हालाही बोलवलं पाहिजे. आमचे नेते आहेत. मंत्री आहेत त्यांना बैठकीला बोलावयला हवे होते. मी विधान सभेचा उपाध्यक्ष असल्याने समाजाचे माझ्याकडे लक्ष आहे. सरकारच्या निर्णया विरोधात आदिवासी आमदार, नेते, संघटना सर्व एकत्र येतील. सर्व आदिवासी नेत्यांची बैठक घेऊन पुढील भूमिका स्पष्ट करणार आहे. विरोध करायचा की न्याय मागायचा हा निर्णय घेतला जाणार आहे, असंही नरहरी झिरवाळ यांनी स्पष्ट केलं.

नाक खुपसू नका

दरम्यान, झिरवाळ यांच्या भूमिकेला धनगर आरक्षणासाठी उपोषण करणारे दीपक बोराडे यांनी विरोध केला आहे. झिरवाळ यांचा बोलावता धनी दुसरा कोणीतरी आहे. नुसते जात प्रेम आहे म्हणून धनगरांना खेटू नका. ध्यानात ठेवा धनगराशी वाकडं, तर नदीत लाकडं, असा इशाराच दीपक बोराडे यांनी दिला आहे.

त्यांचे वय झाले, त्यांनी…

त्यांचे वय झालेले आहे. त्यांनी वयाचे भान ठेवून बोलावे. त्यांच्या आदिवासी खात्याचे मंत्री विजय गावीत यांना आमंत्रण होते. मात्र ते गैरहजर होते. याची झिरवाळ यांनी नीट माहिती घेऊन बोलावे. एका समाजाचे तुम्ही प्रतिनिधित्व करता, तुमच्या समाजाप्रती तुमचे प्रेम आहे, आम्ही आपला आदर करतो आणि आदरपूर्वक बोलतो. आम्ही संविधानाला मानतो. तुम्हीही संविधानाला मानलं पाहिजे. देवेंद्र फडणीस यांनी सांगितले होते की, माझा अभ्यास झालेला आहे. माझ्याकडे पुरावे आहेत. ते त्यांनी द्यावेत. देवेंद्र फडणवीस यांच्या वचनाचा आणि धनगर समाजाचा संघर्ष आहे. या संघर्षात तुम्ही नाक खुपसू नये. आज मी तुम्हाला झिरवाळ साहेब म्हणतो. मात्र उद्या मी काय बोलेल याची तुम्ही कल्पनाही करणार नाही, असा दमच बोराडे यांनी दिला आहे.

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.