Nashik | मुख्याध्यापक लाचखोराच्या पंगतीत; पगार काढण्यासाठी 10 हजार मागताच बेड्या
राज्यभरात अशा अनेक आश्रमशाळा आहेत. काही मतिमंद मुलांच्या शाळा आहेत. मात्र, या ठिकाणी संस्थाचालक आणि मुख्याध्यापक शिक्षकांनाही वेतन करण्यापोटी लाच मागण्याचे प्रकार उघड झाले आहेत. विशेष म्हणजे यातील बहुतांश आश्रमशाळांना सरकारी अनुदान मिळते. मात्र, नोकरीच्या भीतीमुळे अनेक शिक्षक या अन्यायाविरोधात काहीही न बोलता निमूट वागतात.

नाशिकः नाशिक (Nashik) जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातल्या वैतरणा येथील आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकाला (Headmaster) लाच (Bribe) स्वीकारताना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. पगार काढून देण्यासाठी मुख्याध्यापकाने संबंधिताकडे 10 हजारांची लाच मागितली होती. मात्र, कर्मचाऱ्याची लाच देण्याची इच्छा नव्हती. त्यामुळे त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यांनी लाच स्वीकारताना माणिकलाल रोहिदास पाटील या मुख्याध्यापकाला बेड्या ठोकल्या. त्यामुळे पवित्र अशा शिक्षण क्षेत्रात माजलेली ही लाचेची बजबजपुरी कधी थांबणार, असा सवाल निर्माण होत आहे. एकीकडे नाशिकमधील पोषण आहार घोटाळाप्रकरण चर्चेत असताना, हे दुसरे प्रकरण समोर आले आहे. जर विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे पवित्र काम करणारे शिक्षकच असे अव्वल गुन्हेगारांच्या पंक्तीत जाऊन बसत असतील, तर कसे? विद्यार्थ्यांवर नेमके कसे संस्कार होणार? किमान कायद्याची तरी बूज राखणार की नाही. की, त्याचीही भीती उरली नाही, असेच म्हणाण्याची पाळी आली आहे.
नेमके प्रकरण काय?
नाशिक जिल्ह्यातील वैतरणानगर येथे एक शासकीय माध्यमिक आश्रमशाळा आहे. येथे तक्रारदार कंत्राटी कामगार म्हणून काम करतो. गेल्या दहा वर्षांपासून तो कामावर आहे. त्याचे नोव्हेंबर 2021 ते जानेवारी 2022 या काळातील वेतन थकले होते. त्यासाठी मुख्याध्यापक माणिकलाल रोहिदास पाटीलने दहा हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. मात्र, तक्रारदाराला लाच देण्याची इच्छा नव्हती. त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला. तेव्हा त्यांनी सापळा रचला. वैतरणानगर येथील आश्रमशाळएत मुख्याध्यापकाला लाच स्वीकारताना रंगेहाथ बेड्या ठोकल्या.
कर्मचाऱ्यांचा छळ
राज्यभरात अशा अनेक आश्रमशाळा आहेत. काही मतिमंद मुलांच्या शाळा आहेत. मात्र, या ठिकाणी संस्थाचालक आणि मुख्याध्यापक शिक्षकांनाही वेतन करण्यापोटी लाच मागण्याचे प्रकार उघड झाले आहेत. विशेष म्हणजे यातील बहुतांश आश्रमशाळांना सरकारी अनुदान मिळते. मात्र, नोकरीच्या भीतीमुळे अनेक शिक्षक या अन्यायाविरोधात काहीही न बोलता निमूट वागतात. लाच देताना दिसतात. या प्रकाराला सरकराने आळा घालावा, अशी मागणी होत आहे. विशेषतः प्रत्येक कर्मचाऱ्याचे वेतन थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करावे, अशी मागणी होत आहे.
इतर बातम्याः