Nashik | नांदूर मधमेश्वर धरणातून जायकवाडीच्या दिशेने 32 हजार 172 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू…

नाशिक जिल्ह्यातील प्रमुख त्र्यंबकेश्वर, इगतपुरी आणि दिंडोरी तालुक्यात संततधार पाऊस सुरू असल्याने धरणातील पाणीसाठ्यात मोठी वाढ झालीयं. दारणा, गंगापूर आणि पालखेड धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु झाल्याने नांदूर मधमेश्वर धरणाच्या पाण्याच्या पातळीत वाढ झालीयं.

Nashik | नांदूर मधमेश्वर धरणातून जायकवाडीच्या दिशेने 32 हजार 172 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू...
Follow us
| Updated on: Aug 17, 2022 | 10:58 AM

लासलगाव : नाशिक (Nashik) जिल्हात विश्रांतीनंतर पुन्हा एकदा संततधार पावसाला सुरूवात झालीयं. यामुळे धरणातील पाणी साठ्यात देखील मोठी वाढ झाल्याचे चित्र आहे. गंगापूर धरणातून काल पाण्याचा विसर्ग करण्यात आलायं. नाशिक जिल्हातील जवळपास सर्वच धरणे ओव्हर फ्लो (Over flow) झाली असून धरणातून पाण्याच्या विसर्ग सुरू आहे. यामुळे जिल्हातील नद्यांना पुरस्थिती निर्माण झाली असून प्रशासनाकडून (Administration) नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलायं. नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, इगतपुरी आणि दिंडोरी तालुक्यात संततधार पाऊस सुरूयं.

नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, इगतपुरी आणि दिंडोरी तालुक्यात संततधार पाऊस सुरू

नाशिक जिल्ह्यातील प्रमुख त्र्यंबकेश्वर, इगतपुरी आणि दिंडोरी तालुक्यात संततधार पाऊस सुरू असल्याने धरणातील पाणीसाठ्यात मोठी वाढ झालीयं. दारणा, गंगापूर आणि पालखेड धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु झाल्याने नांदूर मधमेश्वर धरणाच्या पाण्याच्या पातळीत वाढ झालीयं. कारण दारणा, गंगापूर आणि पालखेड धरणातून जो पाण्याचा विसर्ग केला जातोयं, तो मधमेश्वर धरणामध्ये होतो आहे.

हे सुद्धा वाचा

नांदूर मधमेश्वर धरणातून 61 टीएमसी 40 लक्ष घनफूट पाणी गोदावरी नदीत सोडण्यात आले

नांदूर मधमेश्वर धरणातून जायकवाडीच्या दिशेने गोदावरीनदी पत्रातून 32 हजार 172 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येते आहे. आज सकाळी 6 वाजेपर्यंत या पावसाच्या हंगामात नांदूर मधमेश्वर धरणातून 61 टीएमसी 40 लक्ष घनफूट पाणी गोदावरी नदीतून सोडण्यात आले. यामुळे आता जाकवाडी धरणातून देखील पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला असून जायकवाडी धरणाते तीन दरवाजे उघडल्याची माहिती मिळतंय. यंदाच्या जोरदार पावसामुळे पाणीटंचाईची समस्या दूर होणार हे नक्की आहे.

'संजय राऊत स्वतः डोंबाऱ्याचा माकड झालाय', भाजपच्या बड्या नेत्याचा टोला
'संजय राऊत स्वतः डोंबाऱ्याचा माकड झालाय', भाजपच्या बड्या नेत्याचा टोला.
नागपूरच्या 'या' चहावाल्याची फडणवीसांकडून दखल, शपधविधीचं विशेष निमंत्रण
नागपूरच्या 'या' चहावाल्याची फडणवीसांकडून दखल, शपधविधीचं विशेष निमंत्रण.
'...तोपर्यंत भाजप शिंदेंना गोंजारेल', 'मातोश्री'वर ठाकरे काय म्हणाले?
'...तोपर्यंत भाजप शिंदेंना गोंजारेल', 'मातोश्री'वर ठाकरे काय म्हणाले?.
बाळ्यामामा म्हात्रे शरद पवारांची साथ सोडणार? फडणवीसांची का घेतली भेट?
बाळ्यामामा म्हात्रे शरद पवारांची साथ सोडणार? फडणवीसांची का घेतली भेट?.
एकनाथ शिंदे ज्युपिटर रूग्णालयातून बाहेर येताच एकच वाक्य म्हणाले...
एकनाथ शिंदे ज्युपिटर रूग्णालयातून बाहेर येताच एकच वाक्य म्हणाले....
छगन भुजबळांना मोठं मंत्रिपद मिळणार? 'त्या' कोटवरून का होतेय चर्चा?
छगन भुजबळांना मोठं मंत्रिपद मिळणार? 'त्या' कोटवरून का होतेय चर्चा?.
एकनाथ शिंदे ठाण्यातील ज्युपिटर रूग्णालयात दाखल, नेमकं झालं काय?
एकनाथ शिंदे ठाण्यातील ज्युपिटर रूग्णालयात दाखल, नेमकं झालं काय?.
मारकडवाडी फेरमतदानाबाबत राम सातपुतेंकडून ऑडिओ क्लिप ट्विट
मारकडवाडी फेरमतदानाबाबत राम सातपुतेंकडून ऑडिओ क्लिप ट्विट.
तुम्ही कोल्डड्रिंक्स पितात? सिगारेट-तंबाखूचंही व्यसन आहे? मग हे वाचाच.
तुम्ही कोल्डड्रिंक्स पितात? सिगारेट-तंबाखूचंही व्यसन आहे? मग हे वाचाच..
शिंदे विरोधी पक्षनेते? भाजपचं षडयंत्र... अंजली दमानिया काय म्हणाल्या?
शिंदे विरोधी पक्षनेते? भाजपचं षडयंत्र... अंजली दमानिया काय म्हणाल्या?.