एमपीएससीच्या कारभारावर आदित्य ठाकरेंची टीका; म्हणाले, अन्यथा राजीनामा द्या…
Aditya Thackeray on MPSC Student Protest : पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं. या आंदोलनंतर एमपीएससीने ही परीक्षा पुढे ढकलली आहे, यावर ठाकरे गटाच नेते आदित्य ठाकरे यांनी भाष्य केलं आहे. नाशिकमध्ये बोलताना यावर आदित्य ठाकरेंनी टीका केली आहे. वाचा...
पुण्यातील नवी पेठेत एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं. 25 तारखेला होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात यावी. राज्यसेवा आयोग आणि आयबीपीएसचा परिक्षा एकाच दिवशी असल्याने त्याची तारीख बदलण्यात यावी तसंच कृषी विभागाच्या जागा राज्यसेवा आयोगात समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं. अखेर यावर एमपीएससी आयोगाने निर्णय घेतला. ही परीक्षा पुढे ढकल्याणात आली आहे. या पेपरची पुढची तारीख लवकरच कळवण्यात येणार आहे. यावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नाशिकमध्ये बोलताना त्यांनी एमपीएससी आयोगाच्या कारभारावर त्यांनी टीका केली आहे.
एमपीएससी आंदोलनावर काय म्हणाले?
वारंवार एमपीएससी आयोगाकडून चुकीची पाऊले का उचलली जातात? वारंवार विद्यार्थ्यांच्या आंदोलनासाठी का थांबतात? आम्ही या आंदोलनाला पाठींबा दिलाय. राष्ट्रवादीने, काँग्रेसने सर्वांनी पाठींबा दिलाय. कारण हा तरुणांचा विषय आहे. त्यांच्या भविष्याचा विषय आहे. एकतर महाराष्ट्रमध्ये रोजगार उपलब्ध होत नाही. नोकऱ्या उपलब्ध होत नाहीत. त्यात स्पर्धा परीक्षांचा हा घोळ आहे. किती वेळा मुलं आंदोलन करणार? बेसिक प्लॅनिंग एमपीएससीने करावं. अन्यथा एमपीएससी आयोगवाल्यांनी राजीनामा द्यावा, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
शक्ती कायदावर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया
शक्ती कायद्यावरही आदित्य ठाकरे यांनी भाष्य केलं आहे. महाराष्ट्रात महिलांच्या विरोधात घटना घडतात. आता महिला बोलायला लागल्या आहेत. पुण्याची हिट अँड रनची केस झाली. वेदांत अगरवाल कुठे आहे? मुंबईत हिट अँड रनची केस झाली. त्यातला आरोपी कुठं आहे? यावर आता आपण विसरत गेलोय. राष्ट्रपती महोदयांकडे आम्ही जो शक्ती कायदा पारित केला होता. तीन वर्षांपूर्वी तो आणा कारवाई करा पोलिसांना ताकद द्या, असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.
आपल्याला सर्व समाजाला पुढे घेऊन जायचे. सगळे समाज आपल्या न्याय हक्कासाठी लढत आहे. काहीजणांना न्याय हक्कासाठी लढावे लागत आहे. काहींना या खोके सरकारने फसवले. आम्ही सगळ्यांना न्याय देऊ. आमच्या अडीच वर्षाच्या काळात कुठेही हिंसक आंदोलन झाले नाही. कारण आमच्या काळात सर्वांचे ऐकून घेत होतो. शेतकऱ्यांचा असेल महिलांचा असेल प्रत्येक समाजाचा असे प्रत्येक धर्माचा असेल. सत्ताधाऱ्यांचं काम असतं जे निवेदन येतात ते घ्यावे. कोणावर लाठी चार्ज केला जात आहे. जरांगे पाटील साहेबांवर जो लाठीचार्ज झाला. एसपींची बदली झाली अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. सीएम की दोन डीसीएम तिघांमधून आदेश कोणी दिले ते माहिती नाही.जनरल डायर कोण आहे माहिती नाही, असं आदित्य ठाकरे म्हणाले.