भाजपच्या ‘त्या’ नेत्या विरोधात प्रचंड रोष, NDA कडे मुद्दे नव्हते; अशोक वानखेडेंकडून लोकसभा निवडणुकीचं विश्लेषण

| Updated on: May 25, 2024 | 8:06 PM

Ashok Wankhede on Loksabha Election 2024 BJP NDA India Aghadi : लोकसभा निवडणुकी रणधुमाळी सध्या महाराष्ट्रात संपली आहे. आता सर्वांना उत्सुकता आहे ती निकालाची... या निवडणुकीत कोणते मुद्दे सर्वात जास्त महत्वाचे ठरले? यावर राजकीय विश्लेषक अशोक वानखेडेंनी भाष्य केलंय. वाचा...

भाजपच्या त्या नेत्या विरोधात प्रचंड रोष, NDA कडे मुद्दे नव्हते; अशोक वानखेडेंकडून लोकसभा निवडणुकीचं विश्लेषण
Follow us on

देशातील सर्वात मोठा लोकशाही उत्सव होतोय, लोकसभा निवडणूक होतेय. दर पाच वर्षांनी होणारी निवडणूक ही वेगळी असते. त्या निवडणुकीतील मुद्दे वेगळे असतात. यंदाची लोकसभा निवडणूक वेगवेगळ्या मुद्द्यांवरून गाजली. या निवडणुकीतील मुद्दे अन् प्रचाराची रणनिती यावर राजकीय विश्लेषक अशोक वानखेडे यांनी भाष्य केलंय. टीव्ही 9 मराठीशी बोलताना अशोक वानखेडे यांनी यंदाच्या लोकसभा निवडणुकीवर मुद्द्यांवर प्रकाश टाकला. तसंच भाजपच्या बड्या नेत्याविषयी त्यांनी एक विधान केलंय. तसंच महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेत राहिलेल्या नाशिकच्या जागेवरून पडद्यामागे काय घडलं? यावरही अशोक वानखेडे यांनी भाष्य केलंय.

अशोक वानखेडे यांचं विश्लेषण

भाजपचा पराभव करायचा म्हणून प्रकाश आंबेडकर काँग्रेससोबत येतात आणि बारा जागा, पाच जागा मागतात. दहाच्या आतमध्ये महायुती सिंगल डिजिटमध्ये दिसत आहे. शरद पवार उद्धव ठाकरे यांनी भारत चांगले उमेदवार दिले असे नाही. लोकांच्या मनात या सरकारच्या विरुद्ध, तोडफोडी विरोधात महाराष्ट्रात जो रोष दिसत आहे, तो देवेंद्र फडणवीस यांच्याविरुद्ध दिसत आहे, असं अशोक वानखेडे म्हणाले.

वंचित बहुजन एक्सपोज झाले . राज्यघटना बदलणाऱ्या संविधान बदलणार आहे. ते तळागाळातील माणसांपर्यंत पोहोचले. एक विरोधी पक्षाने चांगलं केलं. आंबेडकर म्हणतात आपण वंचित वंचित मी आतापर्यंत फक्त बीजेपीला मदत केली आहे. जाणून बुजत नाही तर त्यांच्यामुळे मदत होते. तीच बीजेपी बाबासाहेबांचे संविधान बदलते त्यांना का मदत केली पाहिजे, असंही वानखेडे म्हणाले.

निवडणुकीत कोणते मुद्दे महत्वाचे ठरले?

इंडिया आघाडीचे प्रचाराचे मुद्दे जास्त सार्थ वाटले. NDA आघाडी मुद्यापासून भटकत होती. नरेंद्र मोदी देशातील समस्यांपासून भटकतात. राम मंदिर, तीन तलाक तेच बोलतात. काँग्रेस चे घोषणा पत्र आल्यावर ते सांगतात. हे प्रकरण डिरिअल होत आहे. नवीन इशू काढत आहे त्याच्यावर देशाचं लक्ष जाईल. मोदींचा तोच गेम प्लॅन पहिल्यापासून असतो. मोदींना कोणी गुरू म्हणून भेटले असेल तर त्या ममता बॅनर्जी , ममता बॅनर्जी फक्त बंगाली अस्मिता आणि बंगाल पुरताच उपस्थित राहिल्या. बेरोजगारी, महागाई, शेतकऱ्यांचे प्रश्न यावर बोलत नाहीत , निरउत्साहित होतात, असंही अशोक वानखेडे म्हणाले.

नाशिकच्या जागेवर काय म्हणाले?

छगन भुजबळांसारखे माणूस जेव्हा म्हणतो मला निवडणूक लढवायची नाही, तेव्हा कळतं. नाशिकची जागा अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनाही जागा हवी होती. अगोदर शिवसेना बीजेपी एकत्र लढायचे तेव्हा हिंदुत्वाचं बॉण्डिंग होतं. 48 पैकी कुठेही महायुती एकत्रित लढताना दिसले नाहीत. सहानुभूती आहे. म्हणूनच मतांचे ट्रान्सफर झालं मुठ बांधली गेली. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी वाईट काय केलं. जसं सरकार चालत जसं चालू दिलं पाहिजे होतं. नंतर सत्तेत आले असते. भ्रष्टाचार सांगता आणि अजित पवारांना मांडीवर घेऊन बसता… पूर्ण राज्याच्या राजकारणात किरीट सोमय्या यांची दया येते, असंही अशोक वानखेडे यांनी म्हटलं आहे.