Malegaon | मालेगावात काैटुंबिक वादात मध्यस्थी करणाऱ्या तरुणाचा पायच छाटला, तलवारीने वार करत जीवे मारण्याचा प्रयत्न!
नाशिक जिल्हातील या चारही घटनांमुळे नागरिक भयभीत झाले आहेत. मालेगावात गँगवारच्या घटनांमध्ये देखील मोठी वाढ झाली आहे. एका आठवड्यात 2 खून तर तीन ठिकाणी गँगवारच्या घटना घडल्याने आर्श्चय व्यक्त केले जात आहे. मावस भावाच्या काैटुंबिक वादात मध्यस्थी करणाऱ्या तरुणावर पाच जणांनी प्राणघातक हल्ला केला.
मालेगाव : नाशिक (Nashik) जिल्हामध्ये गेल्या काही दिवसांपासून हत्या आणि गँगवारच्या घटनांमध्ये मोठी वाढ झालीयं. एका मांत्रिकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यानंतर एका युवकाचा गळा चिरून खून करण्यात आला. तिसरी घटना म्हणजे एका तरूणाला चार ते पाच तरूणांनी (Young) बेदम मारहाण केली आणि यामध्येच त्या तरूणाचा जीव देखील गेला. नाशिक जिल्हातील या तिन्ही घटना ताज्या असतांनाच आता मालेगावात (Malegaon) काैटुंबिक वादात मध्यस्थी करणाऱ्या तरूणावर तलवारीने सपासपा वार करत त्याचा पायच छाटला. इतकेच नाही तर या तरूणाच्या अंगावर असंख्य वार देखील करण्यात आले.
मावस भावाच्या काैटुंबिक वादात मध्यस्थी करणाऱ्या तरुणावर प्राणघातक हल्ला
नाशिक जिल्हातील या चारही घटनांमुळे नागरिक भयभीत झाले आहेत. मालेगावात गँगवारच्या घटनांमध्ये देखील मोठी वाढ झाली आहे. एका आठवड्यात 2 खून तर तीन ठिकाणी गँगवारच्या घटना घडल्याने आर्श्चय व्यक्त केले जात आहे. मावस भावाच्या काैटुंबिक वादात मध्यस्थी करणाऱ्या तरुणावर पाच जणांनी प्राणघातक हल्ला केला. एकाने उजव्या पायावर तलवारीने वार केल्याने अर्धा पाय छाटला गेला आहे. माेहंमद राशिद असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.
गँगवारच्या घटनांनी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
हा प्रकार बुधवारी पहाटे अडीच वाजता लब्बैक हाॅटेलच्या पाठिमागे घडला. मालेगाव शहरातील सतत होणाऱ्या गँगवारच्या घटनांनी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून पोलीस प्रशासनाच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातं आहे. गेल्या आठवड्यात 2 खून तर तीन ठिकाणी गँगवारच्या घटना झाल्या आहेत. तरूणाचा अर्धा पाय छाटला असून अंगावरही तलवारीचे अनेक वार करण्यात आल्याने रक्तस्त्राव मोठा प्रमाणात झाला आहे.