Nashik: किमती गगनाला भिडल्याने बैल चोरीच्या घटना वाढल्या; शेतकरी हवालदिल
नाशिक जिल्ह्यातून बैलजोड्या चोरीला जाण्याचा प्रमाणात वाढ झाली आहे. सध्या चार दिवसांत मे महिना सुरू होईल. त्यानंतर येणाऱ्या जून महिन्यात पेरण्यांची लगबग असेल. त्यापूर्वी पोलिसांनी चोरट्यांना बेड्या ठोकाव्यात. ज्या शेतकऱ्यांच्या बैलजोड्या चोरीला गेल्या आहेत, त्या त्यांना मिळवून द्याव्यात, अशी मागणी होताना दिसत आहे.
मालेगावः बाजारात पशुधनाच्या किमती गगनाला भिडल्याने बैल चोरीच्या (Bull Theft) घटना वाढल्या आहेत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय. नाशिक (Nashik) जिल्ह्यातल्या मालेगाव, बागलाण, सटाणा परिसरात सातत्याने बैल चोऱ्या होत आहेत. सटाणा तालुक्यातील पिंपळदर आणि मालेगावातील वडगाव येथील दोघा शेतकऱ्यांच्या बैलजोडी चोरीला गेल्यात. त्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांची बैलजोडीची किंमत लाखोंची आहे. यातले चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. आधीच अडचणीत असलेल्या बळीराजाला बैलचोरीमुळे मोठा आर्थिक फटका बसत आहे. विशेषतः बैलजोडीशी शेतकऱ्यांचा अधिकच जिव्हाळा असतो. त्यामुळे पोलिसांनी (Police) लवकरात लवकरच यातील चोरट्यांना बेड्या घालून पशुधन वापस मिळवून द्यावे अशी मागणी होत आहे. रात्रीच्या वेळी गाय-वासरांना बेशुद्ध करून पळवून नेण्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी लोणावळा शहरात उघडकीस आला. तसा प्रकार तरी इथे होत नसावा ना, अशी शक्यताही व्यक्त होत आहे.
लवकरात लवकर चोरटे शोधा…
नाशिक जिल्ह्यातून बैलजोड्या चोरीला जाण्याचा प्रमाणात वाढ झाली आहे. सध्या चार दिवसांत मे महिना सुरू होईल. त्यानंतर येणाऱ्या जून महिन्यात पेरण्यांची लगबग असेल. त्यापूर्वी पोलिसांनी चोरट्यांना बेड्या ठोकाव्यात. ज्या शेतकऱ्यांच्या बैलजोड्या चोरीला गेल्या आहेत, त्या त्यांना मिळवून द्याव्यात, अशी मागणी होताना दिसत आहे. एकीकडे बैलजोड्यांच्या किमती लाखोवर गेल्या आहेत. त्यात या चोरीच्या घटना. त्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. वरून निसर्गाचा अवकृपा वेगळीच.
बुलढाण्यात महागाईचा असाही फटका…
महागाई आणि चारा टंचाईमुळे काळजावर दगड ठेवून जीवापाड जपलेली गाई- गुरे- म्हशींची विक्री करण्याची वेळ आता बुलडाणा जिल्ह्यात पशुपालकांवर आलीय. त्यामुळे खामगाव येथील टीएमसी मार्केट यार्डमध्ये गुरांच्या बाजारात परिसरातील पशुधन मोठ्या प्रमाणात कवडीमोल भागात विक्री केल्या जात आहेत. शेतीला पूरक व्यवसाय म्हणून अनेक शेतकऱ्यांनी गाई-म्हशी पाळल्या आहेत. दुष्काळावर मात करीत अनेकांनी पशुपालन तसेच दुग्ध व्यवसाय सुरू केला होता. मात्र सतत चारा, आणि जनावरांच्या खाद्यामध्ये होणारी दरवाढमुळे शेतकऱ्यांना हिरवा चारा मिळणे अवघड झालेय.
इतर बातम्याः
Mirza Ghalib | जगण्याचं तत्वज्ञान मलमली भाषेत सांगणाऱ्या असदुल्लाह-ख़ाँ-‘ग़ालिब’ का पता…!