चंदन पुजाधिकारी, प्रतिनिधी – टीव्ही 9 मराठी, नाशिक | 02 जानेवारी 2024 : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एक ट्विट केलं आणि राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ हे भाजपच्या वाटेवर आहेत का? असा सवाल अंजली दमानिया यांनी विचारला. अंजली दमानिया यांनी हे ट्विट करताच राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली की, छगन भुजबबळ खरंच भाजपच्या वाटेवर आहेत का? दमानिया यांच्या ट्विटला आता खुद्द मंत्री छगन भुजबळ यांनीच उत्तर दिलं आहे. त्यांच्या या ट्विटला आता खुद्द मंत्री छगन भुजबळ यांनीच उत्तर दिलं आहे. भाजपकडून कसलीही ऑफर आलेली नाही, असं छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलं आहे.
मला अजून भाजपच्या ऑफरबद्दल काही माहिती नाही. दमानियांना कशी काय माहिती मिळाली? हे मला माहीत नाही. मला कुठल्या पदाचा हौस नाही. गेल्या अनेक वर्षांपासून मी ओबीसी समाजासाठी काम करत आहे. नवीन काही आता मला पाहिजे, असं काही नाही. असं काही प्रपोजल मला आलेलं नाही. माझ्या पक्षात मी मंत्री आहे. माझी काही घुसमट होत नाहीये, असं छगन भुजबळ यांनी सांगितलं.
भुजबळ भाजपच्या वाटेवर? एकेकाळी भुजबळांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध जनहित याचिका करणारा भाजप त्यांना मोठा ओबीसी नेता बनवणार? अशा भ्रष्ट माणसांना मोठं करणार, राजकारणासाठी? कुठे फेडाल हे पाप?, असं ट्विट अंजली दमानिया यांनी केलं. त्यांच्या या ट्विटनंतर चर्चांना उधाण आलं. आता भुजबळ यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
भुजबळ भाजप च्या वाटेवर?
एके काळी भुजबळांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध जनहित याचिका करणारा भाजप त्यांना मोठा ओबीसी नेता बनवणार?
अशा भ्रष्ट माणसांना मोठं करणार, राजकारणासाठी?
कुठे फेडाल हे पाप
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) February 1, 2024
गेल्या काही दिवस पूर्वी मला एकाने सांगितले की भुजबळांना भाजप हे ओबीसी फेस बनवणार आहेत. फक्त राज्यात नाही देशभरात ओबीसी म्हणून फेस करणार आहेत. मनोज जरांगे हे एक साधे शेतकरी होते पण ते जर एवढा मोठा लढा देऊ शकतात तर भुजबळ सारखा फेस भाजप ला त्यांच्या गरज का पडली? भुजबळ भाजपच्या वाटेवर आहेत का?, असं टीव्ही 9 मराठीशी बोलताना अंजली दमानिया यांनी म्हटलं.