बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणावरून भुजबळांचा सरकारला घरचा आहेर; म्हणाले, हत्येची जबाबदारी…
Chhagan Bhujbal on Baba Siddique Shot Dead : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणावरून छगन भुजबळ यांनी घरचा आहेर दिला आहे. बाबा सिद्दिकी यांच्या हत्येवरून भुजबळांनी मुख्यमंत्र्यांबाबत विधान केलं आहे. पोलिसांना फ्री हॅन्ड दिलं पाहिजे, असंही छगन भुजबळ म्हणाले आहेत. वाचा...
माजी मंत्री, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर मुंबईच्या वांद्रे भागातील निर्मल नगरमध्ये गोळीबार झाला. या गोळीबारामध्ये बाबा सिद्दिकी यांचा मृत्यू झाला. काल रात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणावर मंत्री छगन भुजबळ यांनी भाष्य केलं आहे. छगन भुजबळ यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे. नाशिकच्या येवल्यामध्ये बोलताना भुजबळांनी बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणावर भाष्य केलं. बाबा सिद्दिकी यांच्या हत्येची जबाबदारी फक्त गृहमंत्र्यांची नाही. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील आहे, असं भुजबळ म्हणालेत.
भुजबळांचा सरकारला घरचा आहेर
बाबा सिद्दीकी यांना अनेक वर्षा पासून ओळखत होतो. त्यांना धमकी देण्यात आल्यानंतर त्यांना वाय सुरक्षा सुरक्षादेण्यात आली होती. मात्र सुरक्षा देऊन काही होत नाही. धमकी कोणी दिली होती याच्या तपास करायला पाहिजे होतं. पोलीस काय करीत होते?, असा सवाल छगन भुजबळ यांनी उपस्थित केला आहे.
आमच्या भायखळा येथील तालुका प्रमुखांची देखील निर्घृण पणे हत्या करण्यात आली आहे. मुंबई पोलिसासाठी हे एक चॅलेंज आहे. 10 /20 हजारात ही पोरं हत्या करत आहेत. ही कॉन्ट्रकट किलिंग आहे. पोलिसांना फ्री हॅन्ड दिलं पाहिजे. ही जबाबदारी फक्त गृहमंत्र्यांची नाही तर मुख्यमंत्र्याची देखील आहे, असं छगन भुजबळांनी म्हटलं आहे.
जरांगेंच्या दौऱ्यावर भुजबळ काय म्हणाले?
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आज येवला दौऱ्यावर आहेत. छगन भुजबळ यांनी भाष्य केलं आहे. मी मराठ्याचा द्वेष केला असता तर आरक्षणाच्या तीन कायद्यांना सपोर्ट केला नसता. माझे कार्यकर्ते 50 टक्क्यांपेक्षा जास्त मराठा आहेत. निवडणुकीत विजयी झालेले सुद्धा मराठा कार्यकर्ते आहेत. एकदा जरांगे काय जातीवाद करतात ते पाहा… शिवाजी महाराज पोष्टरवर शाहू फुले आंबेडकर यांचे फोटो होते. ते जरांगे यांनी काढून टाकले होते.. 30 कोटी रुपये खर्चून उभारलेल्या मुक्तिभुमित जरांगे यांचे स्वागत आहे. त्यानिमित्ताने त्यांना विकास दिसेल, असं भुजबळ म्हणालेत.