वादग्रस्त विधानावरून भुजबळांनी आव्हाडांना सुनावलं; म्हणाले, कुणाला काय बोलतो..
Chhagan Bhujbal on Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांबाबत आक्षेपार्ह विधान केलं आहे. त्यांच्या या विधानावर छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी जितेंद्र आव्हाडांना जुन्या गोष्टींची आठवण करून दिली आहे. छगन भुजबळ काय म्हणाले? वाचा सविस्तर...
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केलं आहे. मला जितेंद्र आव्हाड यांना सांगायचे आहे की तुम्ही अनेक वेळा चुकीचे विधान केल्यामुळे अडचणीत आले आहेत. शब्द विचारपूर्वक वापरले पाहिजेत. कुणाला काय बोलतो याचा विचार केला पाहिजे. तुमच्यासोबत 25 ते 30 वर्ष राहिले आहेत. त्यांना लागू होतो. त्यांच्या राजकीय आयुष्य मध्ये पुढे आणण्यासाठी जसे शरद पवारांचे हात आहे. तसे छगन भुजबळ यांचा देखील हात आहे. त्यांना हे माहिती आहे. एखाद्या राजकीय पक्षाबद्दल विश्लेषण करते त्याचे सर्वांना दुःख होतो. निवडणूक आयोग आणि न्यायलायने याबाबद्दल निर्णय दिले आहे, असं छगन भुजबळ म्हणालेत.
जितेंद्र आव्हाड यांचं वादग्रस्त विधान
मुंब्र्यात बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार गटाला उद्देशून एक विधान केलं. हे विधान सध्या चर्चेत आलं आहे. ही पाकीटमारांची टोळी आहे, पाकीटमारांची. तुमच्यात हिंमत होती , अजित पवार मर्द की औलाद होते तर म्हणाले असते शरद पवारांनी तुतारी निशाणी घेतली. मीही दुसरं चिन्ह घेऊन लढतो असं म्हटलं असतं तर आपण त्याला मर्द म्हणतो. तुम्ही तर तुमच्या काकाने देशात वाढवलेली पार्टी ती चोरून माझी पार्टी पार्टी म्हणून फिरत आहात. पण जनतेला वास्तव काय आहे हे माहीत आहे, असं जितेंद्र आव्हाड म्हणालेत.
विधानसभा निवडणुकीवर भुजबळ काय म्हणाले?
सध्या विधानसभा निवडणुकीत महायुतीत वेगवेगळ्या मतदारसंघात बंडखोरी पाहायला मिळत आहे. यावरही भुजबळांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रत्येक मतदार संघात महायुती, महाविकास आघाडीत बंडखोरी आहे. सरासरी 30 ते 35 उमेदवार रिंगणात आहेत. उद्या 4 वाजता खरे चित्र स्पष्ट होईल त्यानंतर खऱ्या अर्थाने निवडणुकीला सुरवात होईल, असं छगन भुजबळ म्हणालेत.
आज भाऊबीज आहे. मात्र अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी अद्यापपर्यंत भाऊबीज साजरी केलेली नाही. यावरही भुजबळ बोलले आहेत. थोडीशी ताणाताण आहे. संध्याकाळपर्यंत ते एकत्र येतील अशी आशा आहे. नाही. आज आले तर पुढच्या वर्षी तरी एकत्र आले पाहिजे. राजकीय मतभेद असले तरी कुटुंब फुटू देऊ नये तसा विचारा केला पाहिजे, असं त्यांनी म्हटलं आहे.