‘या’ गोष्टींमुळे लोकांचा आमच्यावर विश्वास, सरकार आमचंच येणार; छगन भुजबळांना विश्वास

Chhagan Bhujbal on Maharashtra Exit Poll 2024 : महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक होत आहे. कालच मतदान पार पडलं आहे. शनिवारी या निवडणुकीचा निकाल येणार आहे. असं असताना काल एक्झिट पोल आले आहेत. यातून कुणाची सत्ता येणार याबाबतचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. वाचा...

'या' गोष्टींमुळे लोकांचा आमच्यावर विश्वास, सरकार आमचंच येणार; छगन भुजबळांना विश्वास
छगन भुजबळ, नेते राष्ट्रवादीImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Nov 21, 2024 | 9:19 AM

राज्यात विधानसभेची निवडणूक होत आहे. काल मतदान प्रक्रिया पार पडली. काल संध्याकाळी विविध एजन्सीचे पोल आले आहेत. यात काही पोलमध्ये महायुतीची सत्ता येणार असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर काही एजन्सीमध्ये महाविकास आघाडीचं सरकार येणार असं दिसतं आहे. तर काही एक्झिट पोलमध्ये कांटे की टक्कर पाहायला मिळणार आहे. या एक्झिट पोलवर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. लोकांचा आमच्यावर विश्वास आहे. त्यामुळे सरकार आमचंच येणार, असा विश्वास छगन भुजबळ यांनी व्यक्त केला आहे.

एक्झिट पोलवर छगन भुजबळांची प्रतिक्रिया

तीन-चार कंपन्यांचे एक्झिट पोल आले. त्यामध्ये तीन कंपनी आहे त्यांचं नावाचे उल्लेख करता येते. महायुतीच्या बाजूने कौल दिलाय यांचे सरकार बनते. सहा महिन्यामध्ये लाडकी बहीण योजना आणली. शेतकऱ्यांना वीज बिल माफ करणारी योजना आहे. शेतकरी सन्मान योजनेत बारा हजार वरून पंधरा हजार रुपये केले. मुलींना फुकट शिक्षण देण्याची योजना आहे. शेतकऱ्यांना एक रुपया घेत लाख दहा लाख रुपये पर्यंत पीक विमा दिला. महिलांसाठी अर्धा एसटीचे भाडे आहे. त्यामुळे लोकांना या योजनांचा फायदा झाला आहे, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.

लोकांचा महायुतीवर विश्वास- भुजबळ

लाडकी बहीण योजनेसाठी महिलांना पंधराशे ऐवजी एकवीसशे रुपये देऊ. अर्ध एसटीची भाडे पूर्ण पणे माफ करू. वृद्धांना बारा हजार रुपये वर्षा योजनेचा पंधरा हजार रुपये करू. अश्या काही गोष्टी आम्ही अमलात आणल्या. विकास कामे भरपूर मोठ्या प्रमाणात झाले. समृद्धी महामार्ग असेल. मुंबईमधले अनेक टर्नर्स आपण केले त्यातून फार सुधारणा, डेव्हलपमेंट विकास झाला आहे. या गोष्टीचा विचार करून मागच्या सहा महिन्यापूर्वी महाराष्ट्रमध्ये जो काही कल होता. तो आता बदललेला आहे. त्यावेळी लोकसभेला संविधान अमुकतमुक अशा अनेक गोष्टीचे गैरसमज पसरवल्या गेला. पण आता लोक महायुतीला कल देतील, असं भुजबळांनी म्हटलं आहे.

नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर पहिले. त्यांनी संविधान जे आहे. उच्च स्थानावर ठेवून नमस्कार करून डोकं ठेवून या संविधानाला जगात कोणीही बदलू शकत नाही. एक विश्वास लोकांमध्ये निर्माण केला. त्याचा परिणाम असा झाला की जो काही मागच्या वेळी फटका बसला. महाराष्ट्र मध्ये घडले तेथून महाराष्ट्र पुन्हा एकदा मागे फिरला महायुतीच्या पाठीमागे उभा राहतोय असं चित्र आहे, असं छगन भुजबळांनी म्हटलं आहे.

छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.