शरद पवार गटाला तुतारी चिन्ह; छगन भुजबळ म्हणाले, त्या चिन्हाने…
Chhagan Bhujbal on Sharad Pawar NCP : शरद पवार गटाला मिळालेल्या नव्या चिन्हावर मंत्री छगन भुजबळांची सविस्तर प्रतिक्रिया... छगन भुजबळ यांची सविस्तर प्रतिक्रिया. छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले? नव्या चिन्हावरून आणि आगामी निवडणुकीवरून भुजबळ नेमकं काय म्हणाले? वाचा...
चंदन पुजाधिकारी,प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी | 24 फेब्रुवारी 2024 : राष्ट्रवादी शरद पवार गटाला नवीन चिन्ह मिळालं आहे. तुतारी या नव्या चिन्हाचं किल्ले रायगडावर आज अनावरण झालं. त्यावर अजित पवार गटाचे नेते, मंत्री छगन भुजबळ यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. तुतारी चिन्हामुळे काही बदल होईल असे वाटत नाही. अनेकांच्या मनात घड्याळ फिट्ट बसले आहे. निवडणूक लोकसभेची आहे त्यात कुणाला पाठवायचा. कोण सरकार चालवू शकते, त्यांना पाठविले जातं. लोकसभा, महानगर पालिका, विधानसभा कोण चालवू शकते हे लोकांना कळालं. कोणाला कुठे बसवायचे हे लोकांना चांगले कळतं, असं छगन भुजबळ म्हणाले.
जरांगेंच्या आंदोलनावर भुजबळ म्हणाले…
मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर छगन भुजबळांनी भाष्य केलंय. मला कल्पना नाही, वर्तमानपत्र वाचले आहे. हायकोर्टात त्याबाबत चर्चा झाली. हायकोर्टाने शांततेत आंदोलन करायला सांगितले आहे. आंदोलन सुरू त्याबाबत कल्पना नाही. जरांगे आदेश अजून लोकांना कळलेले नाही, असं छगन भुजबळ म्हणाले.
‘ते’ लोक कोण होते?- भुजबळ
पंकज भुजबळ यांची गाडी अडवली गेली. त्यावर छगन भुजबळांनी प्रतिक्रिया दिली. पंकज त्या गावात जाणार नव्हता. काही लोक जमलेले होते. लोक कोण होते का ते पाहावे लागणार आहे. स्थानिक राजकारणातील किती होते ते पाहावे लागेल. काळे झेंडे दाखवने हे लोकशाही पद्धतीने आंदोलनाचा भाग आहे. पण हिंसाचार म्हणजे कायद्याचे भंग आहे. भुजबळांचे हातपाय तोडून टाकू हे वक्तव्य आक्षेपार्ह आहे. पंकज भुजबळ मतदारसंघात उभे राहिले तर त्यावेळेस विरोध दर्शवला तर ती वेगळी गोष्ट आहे. मालेगाव पोलिसात गुन्हे दाखल करण्यासंबंधी स्थानिकांनी निवेदन दिले आहे, असं भुजबळ म्हणाले.
कांदा निर्यातीवर काय म्हणाले?
कांदा निर्यातीवर छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिलीय. कांद्याचे भाव वाढले आहे सध्या १६०० रू दर आहे. ५४ हजार टन पेक्षा २ लाख टन कांदा निर्यात वाढली पाहिजेत. निर्यात रोखुच नये, निर्यात सुरूच ठेवली पाहिजे. ४० टक्के ड्युटी सुरुवातीला वाढली, थोडीफार अजून वाढली तरी चालेल पण निर्यात रोखू नये, असं भुजबळ म्हणाले.