विधानसभा निवडणूक, पक्षादेश अन् महायुती; अर्ज भरण्याआधी छगन भुजबळ काय म्हणाले?

Chhagan Bhujbal on Vidhansabha Election 2024 : अर्ज भरण्याआधी छगन भुजबळ यांनी माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा छगन भुजबळ यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. विरोधी पक्षातील लोकांचा सन्मान करा, अशा सूचना त्यांनी कार्यकर्त्यांना केल्यात काय म्हणाले? वाचा सविस्तर...

विधानसभा निवडणूक, पक्षादेश अन् महायुती; अर्ज भरण्याआधी छगन भुजबळ काय म्हणाले?
छगन भुजबळImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Oct 24, 2024 | 11:42 AM

राज्यात विधानसभा निवडणूक होत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करायला आजपासून सुरुवात झाली आहे. आज बरेच राजकीय नेते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ हे देखील काहीच वेळाच अर्ज दाखल करणार आहेत. सकाळी 10 वाजता छगन भुजबळ हे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. उमेदवारी अर्ज भरण्याआधी छगन भुजबळ यांनी टीव्ही 9 मराठीशी संवाद साधला. तेव्हा त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. केलेल्या कामांच्या जोरावर आपण ही निवडणूक जिंकू, असा विश्वास छगन भुजबळ यांनी व्यक्त केला आहे.’

उमेदवारीबाबत छगन भुजबळ काय म्हणाले?

महायुती आणि आमच्या राष्ट्रवादी अजित पवार गटाने आदेश दिल्याने पुन्हा निवडणुकीला उभं राहिलो. 1985 पासून मी विधानभवनात आहे. तुमच्या आशीर्वादाने आणखी पाच वर्ष बसणार आहे. नेहमीच्या निवडणुकीमध्ये थोडी स्पष्टता असायची कोण कुठे आहे. आता मात्र अजून मला कळत नाही कोण कुठे आहे ते. कोण कुठून उभा राहतोय कोण कुठून उभा राहतोय काहीच समजत नाही. लोकसभेच्या वेळी महायुतीला फार मोठा सेटबॅक बसला. मात्र नंतरच्या काळात महायुतीने फार मोठी आघाडी घेतली आहे. आता आमची खात्री झाली आहे की, महायुतीचं शासन पुन्हा एकदा येईल, असं छगन भुजबळ म्हणालेत.

नागरी समस्या अन् विकासकामांवर भाष्य

येवला मतदार संघातील रस्त्याचा पाण्याचा प्रश्न सुटलाय. विकासकामं झाली आहेत, बरंचस काम झालं आहे. महिलांना पाणी आणण्यासाठी बाहेर जावे लागणार नाही. आमच्या पक्षाने मला सांगितलं परत तुम्हालाच उभं राहायचं आहे. येवला लासलगाव मतदार संघातील नागरिकांचा देखील आग्रह आहे. त्यामुळे फॉर्म भरतोय, असं भुजबळ म्हणालेत.

कोणीही जरी आलं, तरी एक विरोधी पक्ष म्हणून आपण त्याचा सन्मान केला पाहिजे. मी कुणालाही शत्रूपक्ष समजत नाही, विरोधी पक्ष असतात. लोक ज्या कुणाला निवडून देतील त्याने लोकांची काम करायची. काम करण्याची लहानपणापासून सवय आहे. महिनाभर मला वाटत नाही, मला काही काम आहे. आता एकदा फॉर्म भरायला जाऊ आणि नंतर शेवटी भाषण करायला जाऊ, असंही भुजबळांनी म्हटलं आहे.

Non Stop LIVE Update
मनसेचं इंजिन धावणार की इतरांना रोखणार? 'या' जागांवर पहिल्यांदाच लढणार
मनसेचं इंजिन धावणार की इतरांना रोखणार? 'या' जागांवर पहिल्यांदाच लढणार.
राष्ट्रवादीकडून 38 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, काय आहे वैशिष्ट्य?
राष्ट्रवादीकडून 38 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, काय आहे वैशिष्ट्य?.
शिवसेनेकडून विधानसभेच तिकीट मिळताच गुलाबराव पाटील म्हणाले, मला खात्री
शिवसेनेकडून विधानसभेच तिकीट मिळताच गुलाबराव पाटील म्हणाले, मला खात्री.
'आता गनिमी काव्याने डाव..', जरांगेंचा लवकरच पहिला उमेदवार जाहीर होणार
'आता गनिमी काव्याने डाव..', जरांगेंचा लवकरच पहिला उमेदवार जाहीर होणार.
मलिक वेटिंगवर... NCPच्या पहिल्या यादीत नाव नाही, तिकीट मिळणार की नाही?
मलिक वेटिंगवर... NCPच्या पहिल्या यादीत नाव नाही, तिकीट मिळणार की नाही?.
माहीममध्ये यंदा बिग फाईट, मनसे-शिंदे गट अन् ठाकरे गटामध्ये तिरंगी लढत
माहीममध्ये यंदा बिग फाईट, मनसे-शिंदे गट अन् ठाकरे गटामध्ये तिरंगी लढत.
निलेश राणे धनुष्यबाण हाती घेणार, कुडाळ येथे पक्षप्रवेशाची जय्यत तयारी
निलेश राणे धनुष्यबाण हाती घेणार, कुडाळ येथे पक्षप्रवेशाची जय्यत तयारी.
महायुतीतून भाजपचे 99, शिंदेचे 45 उमेदवार जाहीर, या 18 जागांवर पेच कायम
महायुतीतून भाजपचे 99, शिंदेचे 45 उमेदवार जाहीर, या 18 जागांवर पेच कायम.
'संजय राऊत हा कुत्र्यासारखा...', शहाजी बापू पाटलांची घसरली जीभ
'संजय राऊत हा कुत्र्यासारखा...', शहाजी बापू पाटलांची घसरली जीभ.
दादांच्या राष्ट्रवादीकडून पहिली यादी जाहीर, 'या' 38 उमेदवारांना संधी
दादांच्या राष्ट्रवादीकडून पहिली यादी जाहीर, 'या' 38 उमेदवारांना संधी.