Nashik | वातावरणातील बदलामुळे ताप, सर्दी आणि डेंग्यूच्या रूग्णसंख्येत नाशिक शहरात झपाट्याने वाढ…
नाशिक शहरात गेल्या काही दिवसांपासून वातावरणातील बदलामुळे ताप, सर्दी, खोकला या रुग्णांच्या संख्येत वाढ झालीयं. महापालिकेच्या अधिकृत आकडेवारीनुसार, ताप, सर्दीच्या रुग्णसंख्येत ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात 1000 रुग्णांची नोंद झालीयं.
मुंबई : कोरोनाने (Corona) दोन वर्षांपूर्वी देशात कहर केला होता. आता कुठे कोरोनाच्या रूग्णसंख्येत घट झालीयं. मात्र, अजूनही पुर्णपणे कोरोना हा गेलेला नाहीयं. आता पावसाळ्याला सुरूवात झालीयं. पावसाळ्यामध्ये साथीचे रोग देखील पाय पसरवण्यास सुरूवात करतात. यामुळे आरोग्य यंत्रणेवर (Health system) ताण येतो. विशेष: मलेरिया, डेंग्यू, स्वाईन फ्लूचे रूग्ण पावसाळ्यात झपाट्याने आढळतात. पावसाळ्यामध्ये परिसरात पाणी मोठ्या प्रमाणात साचते. या पाण्यात डेंग्यूचे डास तयार होतात. यामुळे पावसाळ्यात डेंग्यूच्या रूग्णांमध्ये वाढ होते. नाशिक (Nashik) शहरातही डेंग्यू आणि स्वाईन फ्लूच्या रूग्णांमध्ये मोठी वाढ झालीयं.
वातावरणातील बदलामुळे ताप, सर्दी, खोकला रूग्णसंख्येत वाढ
नाशिक शहरात गेल्या काही दिवसांपासून वातावरणातील बदलामुळे ताप, सर्दी, खोकला या रुग्णांच्या संख्येत वाढ झालीयं. महापालिकेच्या अधिकृत आकडेवारीनुसार, ताप, सर्दीच्या रुग्णसंख्येत ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात 1000 रुग्णांची नोंद झालीयं. महापालिकेकडून आलेला हा रूग्णाचा आकडा धोक्याचा आहे. इतकेच नाही तर नाशिक शहरात स्वाईन फ्लूच्या रूग्णसंख्येत देखील ऑगस्टमध्ये वाढ झालीयं.
डेंग्यू आणि स्वाईच्या रूग्णांमध्येही झपाट्याने वाढ
शहरात डेंग्यू आणि स्वाईन फ्लूचे देखील रुग्ण आढळत आहेत. शहरात आतापर्यंत 53 स्वाईन फ्ल्यू रुग्णांची नोंद झालीयं. आनंदाची बाब म्हणजे सर्व रुग्ण आजारातून मुक्त झाले आहेत. तरी नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन, वैद्यकीय विभागाकडून करण्यात आले. तसेच परिसरात पाणी साचून देऊ नका असेही महापालिका प्रशासानाने नागरिकांना सांगितले आहे.