नाशिकमधील ऑक्सिजन गळतीमुळे झालेल्या 24 मृत्यूंना ठेकेदार कंपनी जबाबदार, आयुक्तांकडून ‘या’ कारवाईचे आदेश

कोरोनाने हाहाकार माजवलेला असताना आणि ऑक्सिजनचा तुटवडा असताना नाशिकमध्ये झालेल्या ऑक्सिजन गळती प्रकरणी अखेर साडेतीन महिन्यांनी कारवाई झालीय. आता नाशिक महानगरपालिका आयुक्तांनी या प्रकरणी ठेकेदार कंपनी जबाबदार असल्याचं सांगत कारवाई केलीय.

नाशिकमधील ऑक्सिजन गळतीमुळे झालेल्या 24 मृत्यूंना ठेकेदार कंपनी जबाबदार, आयुक्तांकडून 'या' कारवाईचे आदेश
Nashik Oxygen Tank Leak
Follow us
| Updated on: Aug 11, 2021 | 8:51 AM

नाशिक : कोरोनाने हाहाकार माजवलेला असताना आणि ऑक्सिजनचा तुटवडा असताना नाशिकमध्ये झालेल्या ऑक्सिजन गळती प्रकरणी अखेर साडेतीन महिन्यांनी कारवाई झालीय. झाकीर हुसेन रुग्णालयात 24 जणांचा बळी घेणाऱ्या या घटनेने संपूर्ण देशाला हादरवून टाकले. आता नाशिक महानगरपालिका आयुक्तांनी या प्रकरणी ठेकेदार कंपनी जबाबदार असल्याचं सांगत कारवाई केलीय. ठेकदार कंपनी निप्पोनला 22 लाख रुपयांचा दंड तर, जाधव ट्रेडर्सला 2 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आलाय.

झाकीर हुसेन रुग्णालयातील या ऑक्सिजन गळती दुर्घटना प्रकरणी ठेकेदार कंपनीला आर्थिक दंड झाला असला तरी नागरिकांकडून ही कारवाई समाधानकारक नसल्याची प्रतिक्रिया येत आहे. 24 जणांचा बळी घेणाऱ्यांना केवळ आर्थिक दंड करणं पुरेसं नसल्याचं मत नागरिक व्यक्त करत आहेत. यावर पालिका आयुक्त कैलास जाधव यांनी ठेकेदार कंपनींना केवळ आर्थिक दंड करुन थांबणार नाही, तर कायदेशीर कारवाई देखील करु, अशी माहिती दिलीय.

नाशिकमध्ये 24 कोरोना रुग्णांचा मृत्यू

नाशिकच्या झाकीर हुसेन रुग्णालयात 21 एप्रिल रोजी दुपारी 12.30 च्या सुमारास ऑक्सिजनची गळती झाल्याचा प्रकार घडला होता. यानंतर काही तास रुग्णालयात गोंधळ पाहायला मिळाला. रुग्णालयात व्हेंटिलेटवर असलेले अनेक रुग्ण हे ऑक्सिजन अभावी तडफडत होते. तर दुसरीकडे ही गळती थांबवण्यासाठी प्रशासनाकडून अथक प्रयत्न केले जात होते. जवळपास एक दीड तासानंतर ही ऑक्सिजन गळती थांबवण्यात आली. या रुग्णालयात कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरु होते. त्यात 150 लोक व्हेंटिलेटरवर होते. त्यातील 24 जणांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला.

‘ठेकेदाराचा हलगर्जीपणा कारणीभूत’

नाशिकमधील दुर्घटनेच्या चौकशीसाठी 7 सदस्यीय उच्चस्तरीय चौकशी समिती नेमण्यात आली होती. या चौकशी समितीत ठेकेदारावर ठपका ठेवण्यात आला आहे. ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे नाशिकच्या डॉ. झाकीर हुसैन रुग्णालयात ऑक्सिजनची गळती झाली. त्यामुळे 24 लोकांना दुर्देवाने प्राण गमवावा लागला, अशी माहिती चौकशी अहवालातून समोर आली.

नाशिकमधील दुर्घटनेचा चौकशी अहवाल दाखल करण्यासाठी शासनाने 15 दिवसांची मुदत दिली होती. पण 15 दिवसांच्या मुदतीपूर्वीच हा अहवाल शासनाकडे दाखल करण्यात आला आहे.  विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली हा अहवाल तयार करण्यात आला आहे.

हेही वाचा :

Nashik Oxygen Leakage : नाशिक ऑक्सिजन गळती दुर्घटना ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे, मुदतीपूर्वीच चौकशी समितीचा अहवाल सादर

Nashik Oxygen Tank Leak Patients Names | नाशिक ऑक्सिजन गळती दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांची संपूर्ण यादी

CCTV Video: 25 जणांचा जीव घेणाऱ्या त्या 32 मिनिटात नाशकात नेमकं काय घडलं? प्रत्येक सेकंदा सेकंदाचा हा रिपोर्ट

व्हिडीओ पाहा :

Nashik Commissioner action on guilty contractor in Nashik Oxygen leak incident

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.