Nashik Corona Update | नाशिकमध्ये गेल्या 24 तासात 39 नवीन कोरोना रूग्णांची नोंद, 20 जणांची कोरोनावर मात !
नाशिक जिल्ह्यात शनिवारी 36 कोरोना रूग्णांची नोंद होती. मात्र, आता नाशिकमधील कोरोना रूग्णांचा आकडा वाढला आहे. काल मुंबईतील कोरोना रुग्णांच्या संख्येत देखील मोठी वाढ झाल्याचे दिसून आले. मुंबईमध्ये काल 2087 नवे कोरोना रुग्ण आढळून आले. मुंबई पालिका प्रशासनानेही आता कोरोना चाचण्या वाढवण्यावर पुन्हा भर दिला आहे.
मुंबई : राज्यामध्ये कोरोना (Corona) रूग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसते आहे. सध्या राज्यात सर्वाधिक रूग्ण हे मुंबईत आहेत. मात्र, नाशिकमधून (Nashik) येणारी आकडेवारी ही देखील धडकी भरवणारीच आहे. कारण नाशिकमधील कोरोना रूग्णांचा आकडा सातत्याने वाढतोय. काल दिवसभरामध्ये जिल्ह्यात 39 नव्या कोरोना रूग्णांची नोंद करण्यात आलीये. तर मागील 24 तासात 20 रुग्णांनी कोरोनावर मात केली. सर्वधिक 103 रुग्ण हे नाशिक महापालिकेच्या (Nashik Municipal Corporation) क्षेत्रात आहे तर 48 रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. वाढणारी आकडेवारी बघता नाशिकरांनी काळजी घेण्याची गरज आहे.
नाशिकमधील कोरोना रूग्णांचा आकडा वाढला
नाशिक जिल्ह्यात शनिवारी 36 कोरोना रूग्णांची नोंद होती. मात्र, आता नाशिकमधील कोरोना रूग्णांचा आकडा वाढला आहे. काल मुंबईतील कोरोना रुग्णांच्या संख्येत देखील मोठी वाढ झाल्याचे दिसून आले. मुंबईमध्ये काल 2087 नवे कोरोना रुग्ण आढळून आले. मुंबई पालिका प्रशासनानेही आता कोरोना चाचण्या वाढवण्यावर पुन्हा भर दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून देशातील कोरोना रुग्णांच्या आकड्यातही मोठी वाढ होताना दिसते आहे. गेल्या चोवीस तासात देशात 12,899 नवीन कोरोना रूग्णांची नोंद झालीये. धक्कादायक म्हणजे एका दिवसामध्ये 15 जणांचा कोरोनाने मृत्यू देखील झाला. देशातील सक्रिय रूग्णांची संख्या आता 72,474 आहे.
मास्क वापरणे झाले महत्वाचे
देशामध्ये सातत्याने कोरोना रूग्णांची वाढ होताना दिसते आहे. यामुळे नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी जाताना मास्क वापरणे आवश्यक आहे. तसेच कार्यक्रमांमध्ये देखील कोरोनाच्या नियमांचे पालन व्हायला हवे. मोठ्या शहरातील कोरोनाचा आकडा वाढत असल्याने देशातील कोरोना रूग्णांच्या आकडेवारीमध्ये देखील मोठी वाढ होते आहे. दहा हजारांच्या खाली असणारा कोरोनाचा आकडा आता परत एकदा वाढतोय. पावसाळ्याचे हंगाम सुरू झाल्यापासून कोरोनासह, डेंग्यू आणि मलेरियाने देखील हातपाय पसरवण्यास सुरूवात केलीये. यामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण अधिकच वाढला आहे.