नाशिक: महाराष्ट्रसह नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा (Nashik Corona Update)धोका अद्यापही कायम आहे. कोरोना विषाणू (Corona Virus) आणि डेल्टा प्लस वेरियंटचं (Delta Plus) वाढतं संकट लक्षात घेता नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे. ब्रेक द चैनचे निर्बंध शिथील केल्यानंतर अनेक नागरिक विकेंडला घराबाहेर पडत पर्यटन स्थळांवर गर्दी करत असल्याचं समोर आलं होतं. नाशिक जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवर गर्दी करणाऱ्या नागरिकांना पोलिसांनी कारवाईचा इशारा दिला आहे. (Nashik Corona Update Nashik Police warn citizens to not make crowd in district without any essential reason)
विकेंडला विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांकावर कारवाई करण्यासाठी नाशिक पोलीस अॅलर्ट झाले आहेत. नागरिक सर्व नियम धाब्यावर बसवत गर्दी करत असल्याचं गेल्या काही दिवसांमध्ये निदर्शनास आलं होतं. हे बघता नाशिक पोलिसांनी कडक इशारा दिलाय. अत्यावश्यक काम वगळता विनाकारण गर्दी कराल तर थेट कारवाईला सामोरे जावं लागेल, असं नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी सांगितलं आहे.
नाशिक जिल्ह्यात सद्य स्थितीत जरी कोरोना रुग्णसंख्या कमी होत असली तरी मात्र पुढील काळात तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेता प्रशासन हाय अलर्टवर आहे.शहरासह ग्रामीण भागात ही कोरोनाने थैमान घातलेल असल्याने जिल्हा परिषद आरोग्य विभागाने प्रत्यक गावागावात विलगीकरण कक्ष उभारण्याच्या सूचना दिल्या आहेत.मात्र, महिना उलटूनही एक ही गावातून विलगीकरण कक्षाचा प्रस्ताव आला नसल्याने आरोग्य विभागाच्या सूचनेला पुन्हा एकदा वाटाण्याच्या अक्षता लावल्या गेल्या आहेत. कोरोनाचे नवनवीन धोके सद्या वाढत आहेत.आणि त्यामुळे पुन्हा एकदा निष्पाप नागरिकांचे बळी जाऊ नये याकरिता प्रशासन काळजी घेतंय,मात्र ग्रामीण भागातील नागरिकांनी देखील सतर्कता बाळगायला हवीय.
1. अत्याआवश्यक दुकाने सकाळी 7 ते 2 आणि इतर दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते 2 सर्व खुले राहतील.
2. मॉल्स आणि थिएटर्स सर्व बंद राहतील.
3. सोमवार ते शुक्रवार हॉटेल्स 50 टक्के खुले दुपारी 2 पर्संत खुले राहतील त्यानंतर पार्सल व्यवस्था असेल. ही सुविधा शनिवार रविवार बंद राहील.
4. लोकल आणि रेल्वे बंद राहतील. मांर्निंक वॉक, मैदाने , सायकलिंग पहाटे 5 ते सकाळी 9 मुभा असेल.
5. 50 टक्के क्षमतेने खासगी आणि शासकीय कार्यालय सुरू असतील.
6. आऊटडोअर क्रीडा सकाळी 5 ते 9 सुरू सोमवार ते शुक्रवार यादरम्यान सुरु असतील.
7. स्टुडियोत चित्रीकरण परवानगी मात्र ते सोमवार ते शनिवार करता येईल.
8. मनोरंजन कार्यक्रम 50 टक्के दुपारी 2 पर्यंत खुले असणार हे सोमवार ते शुक्रवार यावेळेत घ्यावे लागतील.
9. लग्नसोहळे 50 टक्के क्षमतेने तर अंत्यविधी 20 लोकांना उपस्थित राहण्याची मुभा असेल.
10. बांधकाम दुपारी दोन पर्यंत सुरु ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे.
11. शेतीविषयक सर्व कामे करता येतील. ई कॉमर्स दुपारी 2पर्यंत सुरु असेल.
12. जमावबंदी आणि संचारबंदी कायम राहील.
ठाणे जिल्हा पुन्हा तिसऱ्या लेव्हलमध्ये; मॉल-थिएटर्सला पुन्हा टाळं, निर्बंधांमध्ये वाढ https://t.co/jO8vYo3F5R #Thane #coronavirus #COVID19
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 26, 2021
संबंधित बातम्या:
नाशिकमध्ये पावसाची दडी, शेती कामांना ब्रेक, जिल्ह्यावर पाणी टंचाईचं सावट
नाशिकची बहुचर्चित बससेवा सुरु होणार, देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते उद्घाटनाचा भाजपचा प्रयत्न
(Nashik Corona Update Nashik Police warn citizens to not make crowd in district without any essential reason)