Nashik | गुजरातच्या थापाड्यांनी Rajasthan सरकारच्या नावाचा वापर करून घातला 7 कोटींचा गंडा
नाशिकच्या व्यावसायिकाला अव्वाच्या सव्वा नफ्याचे आमिष दाखवून गुजरातमधील थापाड्यांनी तब्बल सात कोटींचा गंडा घातल्याचे प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणी गंगापूर रोड भागातील सुशील पाटील यांच्या तक्रारीवरून गंगापूर रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्यावसायिकांनी कोणाच्याही शब्दांवर विश्वास ठेवून अशी गुंतवणूक करू नये, स्वतः दक्ष रहावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
नाशिकः नाशिकच्या (Nashik) व्यावसायिकाला अव्वाच्या सव्वा नफ्याचे आमिष दाखवून गुजरातमधील थापाड्यांनी तब्बल सात कोटींचा गंडा घातल्याचे प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणी गंगापूर रोड भागातील सुशील पाटील यांच्या तक्रारीवरून गंगापूर रोड पोलीस (Police) ठाण्यात गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी गुजरात येथील संशयितांचा तपास सुरू केला आहे. या प्रकरणाची सविस्तर माहिती अशी की, सुशील भालचंद्र पाटील यांची गुजरातच्या जोधपूर येथील संशयितांशी ओळख झाली. सचिनभाई पुरुषोत्तमभाई वेलेरा, वैभव गहलोत, किशन कोन्तेलिया, सरदारसिंह चौहान, प्रवीणसिंह चौहान, सुहास सुरेंद्रभाई मकवाल, निरवभाई, महेशभाई, प्रग्येशकुमार विनोदचंद्र प्रकाश, संजयकुमार देसाई, सावनुकमार पारनेर, रिशिता शाह अशा 15 जणांनी पाटील यांना मोठ्या नफ्याचे आमिष दाखवले. आपल्याला राजस्थान सरकारमधील ई-टॉयलेट व पर्यटन विभागाच्या जाहिरातीसाठी संपूर्ण राज्याचे ई-टेंडर काम मिळाल्याची थाप मारली. यात गुंतवणूक केल्यास प्रचंड नफा होईल असे आमिष दाखवले. या नफ्याच्या लाभापोटीच पाटील फसले आणि त्यांना गंडा घालण्यात आला. दरम्यान, गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये वैभव गेहलोतसह राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीयांचे नाव असल्याचे समजते. मात्र, वैभव गेहलोत हा राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचा मुलगा आहे की, दुसरा आणखी कोणी, याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.
डोळे झाकून ठेवला विश्वास…
पाटील यांना या प्रकल्पात गुंतवणूक करण्यासाठी भाग पाडली. त्यासाठी सचिनभाई वेलोरा व इतर तेरा जणांच्या बँक खात्यावर 3 कोटी 93 लाख 54 हजार 778 रुपये आटीजीएसद्वारे ट्रान्सफर करण्यास सांगितले. विशेष म्हणजे पाटील यांनी डोळे झाकून विश्वास ठेवला. हे पैसे संबंधितांच्या खात्यात वर्ग केले. त्यानंतरही 2018 ते 2020 या काळात एकूण 6 कोटी 80 लाख रुपये पाटील यांनी वळते केले. मात्र, त्यानंतर गुजरातमधील संशयितांनी पाटील यांना उडवाउडवीची उत्तरे दिली. तेव्हा आपण फसले गेल्याचे समजते. शेवटी पाटील यांनी प्रकरणात पोलिसांकडे धाव घेतली.
पोलीस म्हणतात…
सुशील पाटील यांनी डोळे झाकून गुजरातच्या थापाड्यांच्या शब्दांवर विश्वास कसा ठेवला, याचे पोलिसांनाही आश्चर्य वाटत आहे. अनेक जणांकडे भरपूर पैसा असतो. मात्र, भामटे याचाच लाभ घेतात. गुंतवणूक करा, अव्वाच्या सव्वा रक्कम मिळेल, असे आमिष दाखवतात. पाटील यांच्या बाबतही नेमके तेच घडले. त्यामुळे नागरिकांनी कोणाच्याही शब्दांवर विश्वास ठेवून अशी गुंतवणूक करू नये, स्वतः दक्ष रहावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
इतर बातम्याः