Nashik Crime: तीर्थक्षेत्र नाशिकमध्ये भूमाफियांचा हैदोस; जमिनीच्या वादातून झालेली ही भयंकर मारहाण बघा…!
काही दिवसांपू्र्वी स्वतः पोलीस आयुक्तांनी शहरात भूमाफिया, बिल्डर आणि अधिकारी यांचे संगनमत असल्याचा पत्राद्वारे आरोप केला होता. त्यानंतर हे प्रकरण समोर आले आहे. यावर पोलीस आपले काम करत राहतील, अशी प्रतिक्रिया पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी दिली आहे.
नाशिकः तीर्थक्षेत्र, प्रभू रामचंद्रांच्या पावन पदस्पर्शाने पवित्र समजल्या जाणाऱ्या नाशिकमध्ये (Nashik) गुंडगिरी, गुन्हेगारी (Crime) भयंकर प्रमाणात वाढली आहे. भूमाफियांचा अक्षरशः हैदोस सुरू असून, शहरात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये भयंकर मारहाण झाल्याचे समोर येत आहे. याचे व्हिडीओ व्हायरल झालेत. जीवाचा थरकाप उडवणाऱ्या या घटना असून, पोलीस करतायत काय, असा सवाल आता विचारला जात आहे. गेल्या काही दिवसांपासून नाशिकचे पोलीस आयुक्त चर्चेत आहेत. त्यांनी महसूल विभागाने टाकलेल्या पत्राच्या बॉम्बगोळ्याचा वाद निस्तारता निस्तारत नाही. मात्र, त्यांना शहरात वाढलेली आणि बोकाळत चाललेली गु्न्हेगारी दिसत नाही का, असा सवाल आता महसूल विभागातून केला जात आहे. विशेष म्हणजे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पोलिसांच्या (Police) याच वर्मावर बोट ठेवले होते. त्यानंतर आता हा भयंकर मारहाणीचा प्रकार समोर आला आहे.
नेमके प्रकरण काय?
नाशिकमधील वडाळा गावात एका फ्लॉटवर बांधकाम सुरू होते. या कामावर एका इसमाने हरकत घेतली. तेव्हा टोळक्याने त्याला बेदम मारहाण केली. त्याचा हा व्हिडीओ समोर आला आहे. दुसरीकडे जमिनीच्या वादातून विनयनगर परिसरात टोळक्याने घराच्या आणि गाडीच्या काचा फोडल्या आहेत. तो व्हिडीओही व्हायरल झाला आहे. काही दिवसांपू्र्वी स्वतः पोलीस आयुक्तांनी शहरात भूमाफिया,बिल्डर आणि अधिकारी यांचे संगनमत असल्याचा पत्राद्वारे आरोप केला होता. त्यानंतर हे प्रकरण समोर आले आहे. यावर पोलीस आपले काम करत राहतील, अशी प्रतिक्रिया पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी दिली आहे.
भूमाफिया-बिल्डरांची युती
नाशिकमध्ये जमिनीच्या प्रकरणावरून मारहाणीचे प्रकार वाढले आहेत. हे प्रकार भूमाफिया आणि बिल्डरांच्या युतीतून होत असल्याचा आरोप आहे. यापूर्वी नाशिकमधल्या आनंदवल्लीमध्ये रमेश मंडलिक यांचा भूमाफियांनी सुपारी देऊन खून केला. त्यांची 30 लाख रुपये आणि 10 गुंठे जमिनीची सुपारी होमगार्ड गणेश काळे आणि आबासाहेब भडांगे यांचा भाचा भगवान चांगले याला दिली होती. मंडलिक हे पाच फेब्रुवारी रोजी शेतात पिकांना पाणी देण्यासाठी गेले. तेव्हा त्यांचा गळा चिरून खून करण्यात आला होता. या खून प्रकरणात राजकीय दबाव झुगारून पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी सूत्रधार भूमाफिया रम्मी राजपूतसह त्याचा भाऊ जिम्मी राजपूतला बेड्या ठोकल्या आहेत. विशेष म्हणजे याप्रकरणी रम्मी राजपूतसह बिल्डर बाळासाहेब कोल्हे, सचिन त्र्यंबक मंडिलकसह वीस जणांच्या टोळीवर मोक्कांतर्गत कारवाई केली आहे. इतर बातम्याः