नाशिकमध्ये भाजप नगरसेविकेच्या पतीला मागितली 15 लाखांची खंडणी
नाशिकमध्ये भाजप नगरसेविका प्रियांका माने यांचे पती धनंजय माने यांच्याकडे ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर 15 लाखांची खंडणी मागितली. शिवाय पैसे नाही दिल्यास अॅट्रॉसिटी दाखल करू अशी धमकी दिल्याने खळबळ उडाली आहे.
नाशिकः नाशिकमध्ये (Nashik) भाजप नगरसेविका प्रियांका माने (Priyanka Mane) यांचे पती धनंजय माने यांच्याकडे ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर 15 लाखांची खंडणी (Ransome) मागितली. शिवाय पैसे नाही दिल्यास अॅट्रॉसिटी दाखल करू अशी धमकी दिल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात अनिकेत निकाळे (रा. महालक्ष्मीनगर, हिरावाडी रोड, पंचवटी) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येणाऱ्या काही दिवसांत नाशिक महापालिकेची निवडणूक आहे. सध्या पालिकेचा कारभार प्रशासकांकडे आहे. निवडणुकीपूर्वीच हे प्रकरण उघड झाल्याने याची विशेष चर्चा आहे. संशयितामागे राजकीय विरोध आहेत, असा आरोप धनंजय माने यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वातावरण गरम झालेले पाहायला मिळत आहे.
नेमके प्रकरण काय?
नगरसेविका प्रियांका माने यांचे पती धनंजय उर्फ पप्पू माने यांना संशयित अनिकेत निकाळे यांनी धमकावल्याचा आरोप आहे. त्याने पप्पू माने यांच्याविरोधात अनेक पोलीस ठाण्यात खोट्या तक्रारी केल्या होत्या. तसेच पप्पू माने यांनी जातिवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप करत गुन्हा दाखल करण्याचा इशारा त्यांच्या मित्राला दिला होता. मात्र, मानेंनी 15 लाख रुपये दिले, तर तक्रार मागे घेण्याची तयारी दर्शवली होती. त्यात आठ लाख रुपये रोख रक्कम आणि आपली एक व्यक्ती महापालिकेत कामाला लावावी, अशी मागणी केली होती.
50 हजार दिले पण…
सततच्या त्रासाला कंटाळून माने यांनी संशयिताची भेट घेतली. त्यांना त्रास देण्याचे कारण विचारले. मात्र, संशयिताने पुन्हा पाच लाखांची मागणी केली. माने यांना धमकीही दिली. त्यामुळे त्यांनी नवीन आडगाव नाका येथील ॲक्सीस बँकेच्या शाखेतून 50 हजार रुपये काढून दिले. त्यानंतर पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी निवडणुकीसमोरील हा प्रकार गांभीर्याने घेतला आहे. त्यांना या प्रकरणाचे काही धागेदोरे लागले असून, त्यांनी तपासाला गती दिली आहे.
इतर बातम्याः