Nashik Crime: पतीचे संन्यास वेड अन् सासरच्या छळामुळे विवाहितेची आत्महत्या; म्हणे, फक्त हळद लावण्यापुरते केले लग्न…
पतीचे संन्यास वेड आणि सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना नाशिक (Nashik) जिल्ह्यातल्या कळवण तालुक्यातल्या अभोणा येथे घडली आहे. विशाखा शैलेश येवले असे मृत महिलेचे नाव आहे. या प्रकरणी अभोणा पोलिसांत (Police) पती व सासू-सासऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
मालेगावः पतीचे संन्यास वेड आणि सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना नाशिक (Nashik) जिल्ह्यातल्या कळवण तालुक्यातल्या अभोणा येथे घडली आहे. विशाखा शैलेश येवले असे मृत महिलेचे नाव आहे. या प्रकरणी अभोणा पोलिसांत (Police) पती व सासू-सासऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, विशाखाला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी विशाखाचे कुटुंबीय व गावकरी करीत आहेत. या प्रकरणाची सविस्तर माहिती अशी की, अभोणाच्या विशाखाचे चाळीसगाव येथील शैलेश येवले या तरुणासोबत लग्न झाले होते. मात्र, लग्नाच्या दुसऱ्या दिवशी शैलेशने विशाखाला आपण इस्कॉन संस्थेचे काम करतो. आपल्याला संन्यास घायचा आहे. आपण फक्त हळद लावण्यापुरतेच लग्न केल्याचे सांगितले होते. त्यानंतर तिचे व शैलेशचे जमलेच नाही. या त्रासाला कंटाळून तिने गळफास लावून आपले जीवन संपवल्याचे समोर येत आहे.
विशाखाचा केला छळ
शैलेश येवले हा पत्नी विशाखाला आपण वैवाहिक संबंध ठेवू शकत नाही असे म्हणायचा. तिला वारंवार मारझोड करायचा. त्यामुळे विशाखा गेले काही दिवस माहेर होती. अनेकदा नातेवाईकांनी समजावून तिला चाळीसगावला सासरी पाठवले. मात्र, त्याचाही काही उपयोग झाला नाही. कारण शैलेशसह त्याचे आई-वडील म्हणजेच विशाखाचे सासू-सासरे तिचा सतत छळ करत असत. पती नीट संसार करत नाही आणि वरून छळ या साऱ्याला कंटाळून अखेर विशाखाने आपले जीवन संपवले.
मृत्यूपूर्वी लिहिली चिठ्ठी
विशाखाने गळफास घेण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवलीय. त्यात सगळी माहिती देण्यात आलीय. पतीला संसार करायचा नाही. संन्यास घ्यायचा आहे. त्यामुळे तो आणि सासू-सारे आपला छळ करतात. या छळाला कंटाळून आपण आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे. या प्रकरणी पती शैलेश येवलेसह सासू आणि सासऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी विशाखाच्या आई-वडिलांनी केली आहे. इतर बातम्याः