नाशिकमध्ये फेसबुकवर झालेल्या भांडणातून खून; जिल्हा न्यायालयाकडून तिघांना जन्मठेप

सोशल मीडियावर झालेल्या भांडणातून खून होण्याचा हा प्रकार सात वर्षांपू्र्वीचा आहे. आता परिस्थिती अजून जास्त बदललीय. सोशल मीडियातील पोस्टवरून दंगे पेटण्यापासून ते ठेचून मारण्यापर्यंतचे प्रकार घडतायत. हे पाहता आपण सोशल मीडियावर स्वतःचे वर्तन योग्य ठेवले, तिथे वावराचा अतिरेक टाळला तर बरेच काही टाळता येऊ शकते. खरे तर समाजमाध्यमांवर कसे व्यक्त व्हावे, याचे धडे देण्याची गरज आता निर्माण झालीय.

नाशिकमध्ये फेसबुकवर झालेल्या भांडणातून खून; जिल्हा न्यायालयाकडून तिघांना जन्मठेप
प्रातिनिधिक छायाचित्र.
Follow us
| Updated on: Apr 09, 2022 | 1:17 PM

नाशिकः नाशिकमध्ये (Nashik) फेसबुकवर (Facebook) झालेल्या भांडणातून पुन्हा भांडण उकरून काढून केलेल्या खुनाप्रकरणी (Murder) जिल्हा व सत्र न्यायालयाने तिघांना जन्मठेप आणि प्रत्येक दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. योगेश जाधव, सुमित दिंडोरकर आणि राजरत्न नखाडे अशी आरोपींची नावे आहेत. या प्रकरणाची सविस्तर माहिती अशी की, 11 मे 2015 रोजी पाथर्डी फाटा परिसरातील मुरलीधरनगर येथे एक खून झाला होता. त्यात आरोपींनी तुषार उर्फ बंटी अनिल तायडे आणि आनंद संजय खणके याच्यावर फेसबुकवर झालेल्या भांडणातून वाद घालत हल्ला केला होता. या घटनेत एकाचा मृत्यू झाला होता. या खुनाने एकच खळबळ माजली होती. विशेषतः सोशल मीडियातील भांडणावरून प्रत्यक्षात खून पडल्यामुळे याची धास्तीही अनेकांनी घेतली होती. याप्रकरणाचा निकाल आता सात वर्षांनंतर आला आहे. यातून इतरांनी आणि विशेषतः सोशल मीडियातील कारणावरून भांडण करणाऱ्यांनी बोध घेण्याची गरज व्यक्त होतेय.

चाकूने केले वार

आरोपींचे तुषार अनिल तायडे आणि आनंद संजय खणके यांच्याशी फेसबुकवर भांडण झाले होते. या वादाची कुरापत त्यांनी पुन्हा हे दोघे भेटताच काढली. वादावादीचे पर्यवसन हाणामारीपर्यंत पोहचले. आरोपींनी चाकूने वार करत गंभीर दुखापत केली. याप्रकरणात मृताच्या भावाच्या तक्रारीवरून इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. खटल्यात तिन्ही आरोपींना न्यायाधीश मृदुला व्ही. भाटीया यांनी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. यावेळी सरकारी पक्षातर्फे सहायक सरकारी अभियोक्ता दीपशिखा भिडे यांनी युक्तीवाद केला, त पैरवी अधिकारी म्हणून पोलीस नाईक एस. एस. गायकवाड, एस. यू. गोसावी यांनी काम पाहिले.

अतिरेक टाळला तर…

सोशल मीडियावर झालेल्या भांडणातून खून होण्याचा हा प्रकार सात वर्षांपू्र्वीचा आहे. आता परिस्थिती अजून जास्त बदललीय. सोशल मीडियातील पोस्टवरून दंगे पेटण्यापासून ते ठेचून मारण्यापर्यंतचे प्रकार घडतायत. हे पाहता आपण अफवांवर विश्वास नाही ठेवला आणि सोशल मीडियावर स्वतःचे वर्तन योग्य ठेवले, तिथे वावराचा अतिरेक टाळला तर बरेच काही टाळता येऊ शकते. खरे तर समाजमाध्यमांवर कसे व्यक्त व्हावे, याचे धडे देण्याची गरज आता निर्माण झालीय. इतर बातम्याः

शिवसेना नेते यशवंत जाधवांनी ‘मातोश्री’ला दिलेल्या 2 कोटी रुपयांची यादीच मिळाली; जाधव म्हणतात, ही तर माझी आई…!

पर्यावरण मंत्र्यांना अंधारात ठेवून वादग्रस्त उड्डाणपुलाला घाईघाईत मान्यता; नाशिकमध्ये पुन्हा आंदोलन धुमसणार!

Special Report | देशातल्या सर्वात मोठ्या लेखकाची ख्यातनाम प्रकाशकांकडून लूट; कोण फोडणार पुस्तकांचा तुरुंग?

थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.