Nashik Crime | पतीला सेल्फी पाठवण्याची धमकी देत बलात्कार; सोशल मीडियातली मैत्री पडली महागात

सोशल मीडियावरून ओळख निर्माण करून महिलांवर अत्याचार केल्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. हे प्रकार टाळता येतात. मात्र, त्यासाठी महिलांनी दक्ष असायला हवे. सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणीही मित्र झाला, तरी त्याला स्वतःचा पर्सनल मोबाइल क्रमांक शेअर करू नका. प्रत्यक्षात भेट कधी झाली तरीही...

Nashik Crime | पतीला सेल्फी पाठवण्याची धमकी देत बलात्कार; सोशल मीडियातली मैत्री पडली महागात
सांकेतिक छायाचित्र.
Follow us
| Updated on: Apr 06, 2022 | 11:55 AM

नाशिकः नाशिकच्या (Nashik) येथील विवाहितेशी सोशल मीडियावरून (Social media) मैत्री करून बलात्कार केल्याची घटना घडलीय. या प्रकरणी विवाहितेच्या तक्रारीवरून भद्रकाली पोलीस (Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, संशयिताला अजूनही अटक नाही. या घटनेची सविस्तर माहिती अशी की, नाशिकच्या एका विवाहितेची 18 ते 28 डिसेंबर 2021 च्या दरम्यान शेअर चॅट अॅपच्या माध्यमातून एका तरुणासोबत ओळख झाली. हळूहळू दोघांच्या ओळखीचे मैत्रीत रूपांतर झाले. तरुणाने वेळोवेळी विवाहितेशी संवाद साधला. फोनवरून बोलणेही वाढवले. त्यानंतर त्याने विवाहितेला भेटायला बोलावले. पर्यटनाच्या नावाखाली शिर्डी, त्र्यंबकेश्वर, वणी आदी ठिकाणी दोघेही फिरून आले. या दौऱ्यात त्यांनी अनेक फोटो काढले. विवाहितेने या सोशल मीडियावरील मित्रासोबत सेल्फीही काढली. नेमका याचाच लाभ घेत त्याने विवाहितेला ब्लॅकमेल करणे सुरू केले.

संशयित मुंबईचा रहिवासी

तरुणाने याच फोटोचा वापर हत्यार म्हणून केला. हे फोटो आणि विशेषतः सेल्फी तुझ्या नवऱ्याला पाठवतो अशी धमकी विवाहितेला दिली. त्याने विवाहितेला ब्लॅकमेल करत बोलावून घेतले. त्यानंतर विविध ठिकाणी नेऊन बलात्कार केला. याची वाच्यता केल्यास पुन्हा धमकी दिली. संशयित तरुण मुंबईचा असल्याचे समजते. हा त्रास वाढल्यानंतर विवाहितेने शेवटी भद्रकाली पोलीस ठाण्यात जावून फिर्याद दिली. या प्रकरणी पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक पी. डी. पवार या करत आहेत.

ही पथ्ये पाळा

सोशल मीडियावरून ओळख निर्माण करून महिलांवर अत्याचार केल्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. हे प्रकार टाळता येतात. मात्र, त्यासाठी महिलांनी दक्ष असायला हवे. सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणीही मित्र झाला, तरी त्याला स्वतःचा पर्सनल मोबाइल क्रमांक शेअर करू नका. प्रत्यक्षात भेट कधी झाली तरीही मर्यादा बाळगून रहा. प्रत्येक मित्र वाईट असोतच असे नाही. मात्र, प्रत्येक मित्र चांगला असतो असेही नाही. हे पाहता अशा मित्रात गुंतत जाताना थोडे भान जरूर ठेवा. इतर बातम्याः

पर्यावरण मंत्र्यांना अंधारात ठेवून वादग्रस्त उड्डाणपुलाला घाईघाईत मान्यता; नाशिकमध्ये पुन्हा आंदोलन धुमसणार!

Special Report | देशातल्या सर्वात मोठ्या लेखकाची ख्यातनाम प्रकाशकांकडून लूट; कोण फोडणार पुस्तकांचा तुरुंग?

tv9 Explainer : आप कौन है, भर विधानसभेत नितीशकुमारांनी सभापतींना झापलं, भाजपला झटका देण्याच्या तयारीत?

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.