आरक्षणाच्या मुद्द्यावर शिंदे गटाचे नेते दादा भुसे यांची परखड प्रतिक्रिया; म्हणाले, आधीच्या आरक्षणाला…
Dada Bhuse on Maratha and OBC Reservation : शिवसेना शिंदे गटाचे नेते दादा भुसे यांनी मराठा आणि ओबीसी आरक्षणावर प्रतिक्रिया दिली आहे. दादा भुसेंनी आरक्षणाबाबत सरकारची असलेल्यी भूमिका सांगितली आहे. तसंच यंदाच्या वारीवरही दादा भुसे यांनी भाष्य केलंय. वाचा सविस्तर...
मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा सध्या ऐरणीवर आहे. यावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते दादा भुसे यांनी भाष्य केलंय. ओबीसी आंदोलन कर्त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत. त्यांचे जे काही गैरसमज आहेत ते सरकार पोहोचवण्याचा प्रयत्न आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता. कुठल्याही आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला एक्स्ट्राच आरक्षण दिलं जात असेल. तर त्याच्यात काही गैर नाही. पूर्वीच्या आरक्षणांना धक्का न लागता जे काही दहा टक्के मराठा समाजाला दिला आहे. ते कायद्याच्या चौकटीत दिलं गेलं आहे, दादा भुसे म्हणालेत.
आरक्षणावर काय म्हणाले?
आरक्षणाचा संपूर्ण अभ्यास करून कायद्याच्या चौकटीत राहून आरक्षण दिलं आहे. दिलेलं आरक्षण योग्य आहे. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला 10% आरक्षण देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे . पूर्वीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही. एक टक्काही कुणाचं आरक्षण कमी नाही. त्याच्यामुळे वाद होण्याची शक्यता नाही. सभागृहांमध्ये एक मतांने हा ठराव पारित झाला आहे, असंही दादा भुसे म्हणाले आहेत.
पावसाळा सुरु झाला आहे. अशात काहीच दिवसात पालखीचं प्रस्थान होईल. यावरही दादा भुसे यांनी प्रतिक्रिया दिलीय. संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे प्रस्थान झालं आहे. पंढरपूरपर्यंत ही पालखी जाते. हजारो वारकरी या पालखीत सहभागी झाले आहेत. येणाऱ्या काळात चांगला पाऊस येऊ दे. बळीराजाला कष्टकऱ्याला न्याय मिळू दे, अशी प्रार्थना मी देवाकडे केली आहे, असं दादा भुसेंनी सांगितलं आहे.
शक्तिपीठाचा महत्व त्या त्या भागातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. त्या भागातील शेतकऱ्यांच्या अडीअडचणी त्याचं म्हणणं ऐकून घेऊ. त्यांचा समाधान केल्याशिवाय पुढे मार्गक्रमण होणार नाही. असा शब्द शेतकऱ्यांना देतो, असं म्हणत दादा भुसे यांनी शक्तीपीठ मार्गावर प्रतिक्रिया दिली आहे.
दिंडी अनुदानावर काय म्हणाले?
यंदा वारीतील दिंडीसाठी अनुदान दिलेलं आहे. याचीही भुसे यांनी माहिती दिली आहे. दिंडी प्रमुखाला जी आवश्यक आहे. त्या सुविधा दिंडी प्रमुख देईल. काळानुसार काही बदल होत असतात. निर्मल वारीची सुविधा काही वर्षापासून सुरू झाली आहे. वारकऱ्यांनी किती आनंद व्यक्त केला त्याची माहिती घ्या. जो टीका करणार आहे तो निवडणुका पाहून करणार आहे. निर्मल वारीसाठी , स्वच्छतागृह आरोग्य सुविधा पिण्याच्या पाण्याची सुविधा हे शासन करतं. त्याच्या व्यतिरिक्त दिंडी प्रमुखाला आणखी काही असल्यास अनुदान दिलं जातं. त्याच्याशिवाय ॲडिशनल पाच लाखापर्यंतचा विमा काढलेला आहे, अशी माहितीही दादा भुसेंनी दिली आहे.