मुंबईतील सहा मतदारसंघांसह कल्याण, ठाणे, भिवंडी, पालघर, नाशिक, दिंडोरी, धुळे या मतदारसंघात आज मतदान प्रक्रिया पार पडली. नाशिकमधलं मतदान संपलं. कालावधी संपल्यानंतर मतदान केंद्राचं गेट बंद करण्यात आलं. नाशकात मतदानाच्या दिवशी विविध घडामोडी घडल्या.महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांनी सती आसरा मातेच्या दर्शनाने केला मतदानाचा समारोप केला. सकाळी सुद्धा काळाराम मंदिरात दर्शन घेवून हेमंत गोडसे यांनी दिवसाची सुरुवात केली होती. दिवसभरात नागरिकांच्या भेटीगाठी घेत जाणून कल घेतला. शेवटी देवीच्या दर्शनाने हेमंत गोडसे यांनी केला मतदानाच्या दिवसाचा समारोप केला.
भद्रकाली रोड परिसरात हेमंत गोडसेंना पाहून ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून 50 खोके एकदम ओकेच्या घोषणा देण्यात आल्या. हेमंत गोडसे मतदान केंद्राला भेट देण्यासाठी आले असता ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून त्यांना बघून 50 खोके आणि एकदम ओके अशा घोषणा दिल्या गेल्या. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर म्हणून महायुद्धाच्या कार्यकर्त्यांकडूनही जय श्रीरामचां जय घोष करण्यात आला. ठाकरे गट आणि महायुतीचे कार्यकर्ते आमने सामने आल्यानंतर एकमेकांच्या विरुद्ध घोषणाबाजी केली गेली.
नाशिकमध्ये आजी-माजी आमदार एकमेकांना भिडल्याचं पाहायला मिळालं. नाशिकमधील भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे आणि माजी आमदार वसंत गीते यांच्यात राडा झाला. फरांदे आणि गीते यांच्या वादाचा आणखी एक व्हीडिओ समोर आला आहे. आमदार देवयानी फरांदे आणि माजी आमदार वसंत गीते यांच्यातील वादानंतर नाशिकच्या मध्य विधानसभा मतदारसंघात तणावपूर्ण वातावरण पाहायला मिळतंय. नाशिक पोलिसांकडून नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघात अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
नाशिक लोकसभेच्या रिंगणात उतरलेल्या 31 उमेदवारांचे भवितव्य आता मतपेट्यांमध्ये बंद झालं आहे. चार जूनला या मतभेटीतून उमेदवारांचे भवितव्य समजणार आहे. मात्र आज दिवसभरात मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर आता निवडणूक आयोगाच्या कर्मचारी अधिकाऱ्यांकडून मतपेटाच्या आहेत. त्या पॅक केल्या जात आहेत. सिलिंग करण्याचे काम कर्मचारी करत आहेत. मतदान यंत्र पेट्यांमध्ये पॅकिंग सिलिंग करून स्ट्रॉंग रूमकडे निल्या जात आहेत.