Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nashik Election | महापालिका निवडणुकीतील अंतर्गत बंडाळी रोखण्याचे भाजप – शिवसेनेसमोर मोठे आव्हान

नाशिक महापालिकेसाठी भाजप आणि शिवसेनामधील इच्छुकांची यादी पाहिली, तर कार्यकर्त्यांचे काय होणार, असा सवाल निर्माण होत आहे. पक्षातील धुरणींना तिकीटे दिली, तर तिथून तयारी करणारा उमेदवार आणि त्यांचा गट नाराज होणार. जर कार्यकर्त्यांना तिकीट दिले, तर तिथे पक्षातील दिग्गज मदत करतीलच, याचा नेम नाही. त्यामुळे या दोन्ही पक्षांपुढे अंतर्गत बंडाळी रोखण्याचे मोठे आव्हान आहे.

Nashik Election | महापालिका निवडणुकीतील अंतर्गत बंडाळी रोखण्याचे भाजप - शिवसेनेसमोर मोठे आव्हान
प्रातिनिधिक छायाचित्र.
Follow us
| Updated on: Apr 01, 2022 | 7:05 AM

नाशिकः नाशिक (Nashik) महापालिकेची निवडणूक येत्या काही महिन्यांत होणार आहे. मात्र, पालिकेतील सत्ताधारी भाजप (BJP) आणि विरोधी पक्ष शिवसेना (Shivsena) या दोन्ही मातब्बरांमध्ये निवडणुकीसमोर अंतर्गत बंडाळीचे मोठे आव्हान असणार आहे. निवडणुकीच्या तोंडावर भाजपच्या चार नगरसेवकांनी पक्षाला रामराम ठोकला. त्यानंतर निवडणूक लांबल्याची वार्ता आली. आता काही जणांची धावपळ थांबली असली, तरी पुन्हा त्यांचे मन कधी उचल खाईल याचा नेम नाही. शिवसेनेतही अशीच परिस्थिती आहे. माजी महापौर विनायक पांडे आणि अजय बोरस्ते यांचा वाद सर्वांनाच माहित आहे. सध्या पक्ष राज्यातही सत्तेत आहे. मुख्यमंत्रीपद शिवसेनेकडे आहे. त्यामुळे तूर्तास तरी कोणी जाहीररित्या पक्षविरोधी भूमिका घेताना दिसत नाही. मात्र, अंर्तर्गत बंडाळ्या आणि कागाळ्या सुरू आहेत. याचा फटका निवडणुकीत या  मातब्बर पक्षांना काही प्रमाणात सहन करावा लागेल हे निश्चित.

भाजपचे दिग्गज इच्छुक

महापालिका निवडणुकीतील तिकीट वाटपात ही अंतर्गत बंडाळी उघड होणाराय. आता भाजपचे पाहिले तर आमदार सीमा हिरे यांची मुलगी रश्मी या महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक आहेत. स्वतः सीमा हिरे या नाशिक पश्चिम मतदार संघातून आमदार आहेत. त्यांचे दीर योगेश हे नगरसेवक होते. आमदार देवयानी फरांदे यांचा मुलगा अजिंक्य फरांदे यांना प्रभाग क्रमांक 9 मधून तिकीट हवे आहे. प्रदेश पदाधिकारी लक्ष्मण सावजी यांची मुलगी पूर्वा सावजी, महापौर सतीश कुलकर्णी यांचे चिरंजीव वैभव आणि मुलगा संध्या, प्रदेश पदाधिकारी विजय साने यांचा मुलगा अजिंक्य यांनाही तिकीट हवे आहे. सध्या ते स्वीकृत नगरसेवक आहेत. स्थायी समिती सभापती गणेश गिते यांच्या पत्नी दीपाली, माजी सभागृह नेता सतीश सोनवणे यांचा मुलगा अनिकेत, माजी आमदार सानप यांचा मुलगा मच्छिंद आणि सून यांनाही तिकीट हवे आहे. त्यामुळे यावेळी खरी धुसफूस आणि असंतोष पाहायला मिळणार आहे.

शिवसेनाही नाही मागे

शिवसेनेचा विचार केला, तर महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या घरात तिघांना महापालिका निवडणूक लढवायची आहे. त्यात बडगुजर यांच्या पत्नी हर्षा, मुलगा दीपक आणि स्वतः बडगुजर हे इच्छुक आहेत. विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांचा पुतण्या आदित्यही महापालिकेत येण्यासाठी इच्छुक आहे. ज्येष्ठ पदाधिकारी विनायक पांडे यांचा मुलगा ऋतुराज, पुतणी शिवानी यांनाही तिकीट हवे आहे. सोबतच ज्येष्ठ नगरसेविका कल्पना चुंभळे, त्यांचा मुलगा प्रताप, दीर कैलास या तिघांनाही महापालिकेचे तिकीट हवे आहे. या सर्वांना तिकीट मिळेलच याची खात्री नाही. त्यामुळे अंतर्गत धुसफूस वाढणार हे नक्की.

कार्यकर्त्यांचे काय होणार?

भाजप आणि शिवसेनामधील इच्छुकांची यादी पाहिली, तर कार्यकर्त्यांचे काय होणार, असा सवाल आहे. पक्षातील धुरणींना तिकीटे दिली, तर घराणेबाजीचा शिक्का बसणार तो वेगळाच. शिवाय तिथून तयारी करणारा उमेदवार आणि त्यांचा गट नाराज होणार. जर कार्यकर्त्यांना तिकीट दिले, तर तिथे पक्षातील हे दिग्गज मदत करतीलच, याचा नेम नाही. त्यामुळे या दोन्ही पक्षांपुढे महापालिका निवडणुकीतील ही अंतर्गत बंडाळी रोखण्याचे मोठे आव्हान आहे.

अशी होणार निवडणूक

– त्रिसदस्यीय पद्धतीने प्रभाग

– आता 133 नगरसेवक

– एकूण प्रभाग 44

– 43 प्रभाग 3 सदस्यीय

– 1 प्रभाग 4 सदस्यीय

महापालिकेतील पक्षीय बलाबल

– भाजप – 66 (एका नगरसेवकाचे निधन. सध्या 64)

– शिवसेना – 35 (सध्या 33)

– राष्ट्रवादी – 6

– काँग्रेस – 6

– मनसे – 5

– अपक्ष – 4

इतर बातम्याः

शिवसेना नेते यशवंत जाधवांनी ‘मातोश्री’ला दिलेल्या 2 कोटी रुपयांची यादीच मिळाली; जाधव म्हणतात, ही तर माझी आई…!

पर्यावरण मंत्र्यांना अंधारात ठेवून वादग्रस्त उड्डाणपुलाला घाईघाईत मान्यता; नाशिकमध्ये पुन्हा आंदोलन धुमसणार!

Special Report | देशातल्या सर्वात मोठ्या लेखकाची ख्यातनाम प्रकाशकांकडून लूट; कोण फोडणार पुस्तकांचा तुरुंग?

कराडला बीड तुरूंगात मारहाण? नेमकं काय घडलं? अखेर प्रशासनाकडून सत्य उघड
कराडला बीड तुरूंगात मारहाण? नेमकं काय घडलं? अखेर प्रशासनाकडून सत्य उघड.
'मी मंत्री झालो हे पवारांना मान्यच नाही', जयकुमार गोरेंचा खरमरीत टोला
'मी मंत्री झालो हे पवारांना मान्यच नाही', जयकुमार गोरेंचा खरमरीत टोला.
कराडला मारणारा महादेव गीते कोण?
कराडला मारणारा महादेव गीते कोण?.
तोच राग मनात म्हणून बेदम मारहाण, 'हे' दोघे कराडच्या अंगावर धावले अन्..
तोच राग मनात म्हणून बेदम मारहाण, 'हे' दोघे कराडच्या अंगावर धावले अन्...
कराड, घुले मारहाण प्रकरणात धसांची मोठी मागणी, म्हणाले त्यांना,...
कराड, घुले मारहाण प्रकरणात धसांची मोठी मागणी, म्हणाले त्यांना,....
कराडला मारहाण? दमानियांची पहिली प्रतिक्रिया; या टोळ्यांमध्ये दुश्मनी..
कराडला मारहाण? दमानियांची पहिली प्रतिक्रिया; या टोळ्यांमध्ये दुश्मनी...
कराडला तुरुंगात बेदम मारहाण? बीडच्या तुरूंगात कोणी घातला राडा?
कराडला तुरुंगात बेदम मारहाण? बीडच्या तुरूंगात कोणी घातला राडा?.
देशमुख हत्या प्रकरणी राज ठाकरेंचं मोठं विधान
देशमुख हत्या प्रकरणी राज ठाकरेंचं मोठं विधान.
जे पी नड्डा यांच्यानंतर भाजपा नवा अध्यक्ष कोण? 'ही' नावं आघाडीवर
जे पी नड्डा यांच्यानंतर भाजपा नवा अध्यक्ष कोण? 'ही' नावं आघाडीवर.
'.. मग कोणाच्या कानाखाली काढणार?' राऊतांची ठाकरेंवर टोलेबाजी
'.. मग कोणाच्या कानाखाली काढणार?' राऊतांची ठाकरेंवर टोलेबाजी.