Nashik Election Reservation 2022 : नाशिक महापालिकेसाठी आरक्षण सोडत : सर्वसाधारण महिला आरक्षण

नाशिक महापालिका निवडणुकीसाठी आज आरक्षण सोडत जाहीर झाली. अनुसूचित जाती, जमाती महिला आणि सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण निश्चित करण्यात आल. या सोडतीचा कार्यक्रम भाभा नगरमधील दादासाहेब गायकवाड सभागृहात सकाळी सुरु करण्यात आला होता.

Nashik Election Reservation 2022 : नाशिक महापालिकेसाठी आरक्षण सोडत : सर्वसाधारण महिला आरक्षण
Nashik Municipal corporation Image Credit source: Tv9
Follow us
| Updated on: May 31, 2022 | 12:58 PM

नाशिक – राज्यात महापालिका निवडणुकांचे (Municipal Elections) वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारविरुद्ध भाजप अशी रंगतदार लढत आगामी पालिका निवडणुकीत पाहायला मिळणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने 14 महापालिकांना 31 मेपर्यंत प्रभागनिहाय आरक्षण (Ward wise reservation) सोडत जाहीर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सोडत प्रक्रिया पार पडली. अशावेळी राज्यातील महापालिकांची आरक्षण सोडत कशी असेल, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं. सर्व राजकीय पक्षांसह इच्छुक उमेदवारांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. मुंबई, नवी मुंबई, वसई विरार, उल्हासनगर, कोल्हापूर, अकोला, अमरावती, नागपूर, सोलापूर, नाशिक, पुणे, पिंपरी चिंचवड, कल्याण डोंबिवली आणि ठाणे महापालिकांचा समावेश आहे. चला तर जाणून घेऊया नाशिक पालिकेचं इत्यंभूत वॉर्डनिहाय आरक्षण..

अनुसूचित जातीसाठी दहा जागा

नाशिक महापालिका महिला अनुसूचित जातीसाठी आरक्षण सोडत झाली असून यामध्ये दहा जागा देण्यात आल्या आहेत. यामध्ये प्रभाग क्रमांक प्रभाग क्रमांक 12 अ, 14 अ, 22 अ, 25 अ, 26 अ, 34 अ, 35अ, 41 अ, 42 अ या प्रभागाचा समावेश आहे.

सर्वसाधराण महिलांच्या12 जागांसाठी सोडत

नाशिक मनपा निवडणुकीमध्ये सर्वसाधारण महिलांच्या 12 जागेसाठी सोडत जाहीर करण्यात आली. यामध्ये 5 ब, 10 ब, 16 ब, 18 ब, 21 ब, 30 ब, 31 ब , 32 ब, 33 ब, 36 ब, 37 ब या प्रभागांत सर्वसाधारण महिला आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा

अनुसूचित जमाती महिलांसाठी पाच जागा

अनुसूचित जमाती महिलांसाठी एकूण पाच जागा असून 7 ब अनुसूचित जमाती 11 ब अनुसूचीत जमाती थेट आरक्षित राखीव असतील. तर 02 अ, 04 अ, 34 ब या जागा अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी राखीव झाल्या आहेत. नाशिक महापालिका निवडणुकीसाठी आज आरक्षण सोडत जाहीर झाली. अनुसूचित जाती, जमाती महिला आणि सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण निश्चित करण्यात आल. या सोडतीचा कार्यक्रम भाभा नगरमधील दादासाहेब गायकवाड सभागृहात सकाळी 10 वाजता सुरु करण्यात आला होता.

नाशिक महानगरपालिकेत एकूण- 122 जागा

भाजप- 67 ,

शिवसेना- 34 ,

काँग्रेस- 6 ,

राष्ट्रवादी – 6 ,

मनसे 5

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.