गवताच्या गंजीत होरपळून एकाचा होरपळून मृत्यू; नाशिकमधली काळजाचा थरकाप उडवणारी घटना

नाशिक जिल्ह्यातल्या वणी (ता. दिंडोरी) येथे गवताच्या गंजीला लागलेल्या आगीत होरपळून एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडलीय. काल रात्री हा अपघात घडला. त्यात शेतात आग विझवण्यासाठी कसलिही सोय नव्हती. त्यामुळे हा बळी गेला.

गवताच्या गंजीत होरपळून एकाचा होरपळून मृत्यू; नाशिकमधली काळजाचा थरकाप उडवणारी घटना
नाशिक जिल्ह्यातल्या वणी येथे लागलेल्या आगीत एकाचा मृत्यू झाला.
Follow us
| Updated on: Feb 24, 2022 | 12:58 PM

नाशिकः नाशिक (Nashik) जिल्ह्यातल्या वणी (ता. दिंडोरी) येथे गवताच्या गंजीला लागलेल्या आगीत (Fire) होरपळून एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडलीय. काल रात्री हा अपघात घडला. त्यात शेतात (farm) आग विझवण्यासाठी कसलिही सोय नव्हती. त्यामुळे हा बळी गेला. मनोहर पवार असे 54 वर्षीय मृताचे नाव असल्याचे समजते. या घटनेबद्दल पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांमध्ये नाशिक जिल्ह्यात आग लागल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. नुकतीच नाशिकमधल्या एका कंपनीतही आग लागली होती. मात्र, या घटनेत कसलिही जीवित हानी झाली नाही. कंपनीतील सारे सामान जळून खाक झाले.

कशी घडली घटना?

वणी येथील मनोहर पवार हे 23 फेब्रुवारी रोजी बुधवारी लक्ष्मी नगरातील शिवारातल्या शेतात होते. त्यावेळी शेतात रचून ठेवलेल्या गवताच्या गंजीला आग लागली. ही बातमी कळताच गावकऱ्यांसह वणीच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, गवताची गंजी वाळलेली होती. आगीचा भडका उडाला. बराच वेळ आगीचे तांडव सुरू होते. यावेळी आग विझवण्यासाठी अग्निशमन बंब आणि दुसऱ्या पाण्याचीही व्यवस्था नव्हती. या आगीत गवताची गंज पूर्णतः जळून खाक झाली. त्यातच पवार यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले.

हिवाळ्यात आग का लागते?

आग लागण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे वारा. त्याची गती आणि त्याची वाहण्याची दिशा. जास्त आणि कमी दाबाचे पट्टे निर्माण झाल्यामुळे वाऱ्याची गती आणि दिशा सतत बदलत असते. जेव्हा कमी व जास्त दाबाचा पट्टा तयार होतो तेव्हा तिथे तापमान विसंगती तयार होते. अशावेळी थंड हवेचा पट्टा त्याच्याबरोबर किंवा त्याच्यासमोर असणाऱ्या उष्ण हवेला पुढे ढकलत राहतो. या ‘धक्क्या’मुळे आगीची तीव्रता अनेक पटीने वाढते. अशात आग आपली दिशा सतत बदलत असल्यामुळे ती चहुबाजूला पसरते.

आग लागण्याची नेमकी कारणे काय?

सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे जेव्हा इंधन, ऑक्सिजन आणि उष्णता या तिन्ही गोष्टी एकत्र येतात तेव्हा आग तयार होते. अशात थंडीत मात्र हवेत गारवा असतो. पण तरीदेखील आगीच्या घटना समोर येणे ही चिंतेची बाब आहे. आता आग नेमकी कोणत्या कारणाने लागू शकते याचाही विचार करणे महत्त्वाचे आहे.

जंगलांमध्ये झाडांना आग लागणे हे नैसर्गिक असून शकते. इथे झाडे आणि फांद्यामध्ये घर्षण झाल्याने उष्णता निर्माण होते आग लागते.

घरात जर आग लागली तर त्याचं कारण निष्काळजीपणा असून शकतो. गॅस चालू असणं, वीजेचा शॉक सर्कीट होणं, स्टोव्हचा वापर यामुळे आग लागण्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत.

पेट घेणारी रसायने, पेट्रोलियम पदार्थ, विजेंच्या तारांची चुकीच्या पद्धतीने मांडणी केली तरीदेखील आग पेटते. सध्या मोठ्या प्रमाणात सॅनिटायझरचा वापर केला जातो. थंडीत आग लागण्याचे हे मुख्य कारण असू शकते.

एखाद्या घरात , कंपनीत किंवा इतर कुठेही पेट घेणाऱ्या वस्तू अस्तव्यस्त पडल्या असतील आणि त्याचा आगीशी संबंध आला तर त्याने मोठे आगीचे लोळ पसरतात.

अशात सिगारेट ओढून कुठेही फेकणे, सार्वजनिक ठिकाणी ती न विझवता फेकण्यामुळे अनेक आगीच्या घटना घडल्याचे समोर आले आहे. फटाक्यांच्या वापरामुळेही आग लागते.

इतर बातम्याः

Birth Anniversary | पोरकी लेक, प्रसिद्ध अभिनेत्री, 5 वेळा मुख्यमंत्री; जयललितांचा रोमहर्षक प्रवास…!

महापालिकेत घराणेशाहीचा झेंडा; नाशिकमध्ये नेत्यांच्या एका-एका घरातून तिघा-तिघांना हवे तिकीट!

नाशिकमध्ये 7 नगरपरिषदांच्या निवडणुका; प्रभाग रचना 5 एप्रिलला होणार प्रसिद्ध, कसा आहे कार्यक्रम?

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.