नाशिकः नाशिकमध्ये बिंगो रौलेट जुगारातून तरुणांची 45 लाखांची फसवणूक करणाऱ्या दोघा भामट्यांना ग्रामीण पोलिसांनी (Police) बेड्या ठोकल्या आहेत. कैलास शहा आणि प्रीतम गोसावी अशी आरोपीची नावे आहेत. या प्रकरणी पिंपळगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघांनी झटपट पैसे कमावण्याच्या नावाखाली तरुणांना बिंगो रौलेट या ऑनलाइन जुगाराचे व्यसन लावले. त्यांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. नाशिकच्या (Nashik) ग्रामीण भागात बिंगो रौलेट (Roulette) जुगाराने पाळेमुळे रुजवली आहेत. त्यामुळे अनेकांचे संसार उद्धवस्त होत आहेत. अनेक जण देशोधडीला लागत आहेत. यापूर्वी या जुगारात कर्जबाजीरपण आल्यामुळे अनेकांनी आपली पत्नी आणि लहान-लहान मुले मागे सोडून या जगाचा निरोप घेतला आहे. विशेष म्हणजे या जगारातून अवैध सावकारीला प्रचंड प्रमाणात ऊत आलेला दिसून येत आहे.
पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यातील वावी ठुशी (ता. निफाड) येथे या प्रकरणी रामराव बबन रसाळ यांनी कैलास जोगेंद्रप्रसाद शहा आणि प्रीतम गोसावीविरोधात तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीनुसार संशयितांनी फिर्यादीचा विश्वास संपादित केला. त्याच्या मोबाइल क्रमांकावर बिंगो रौलेट फनगेम नावाचे अॅप डाउनलोड करून दिले. शिवाय मेन आयडी व पासवर्ड दिला. एका पॉइंटला 36 रुपये मिळतील असे आमिष दाखवले. यातून 45 लाख 44 हजार 315 रुपयांची फसवणूक केली.
रौलेट बिंगो हा ऑनलाइन जुगार आहे. या जुगारात अनेकजण पैसे गुंतवतात. निराश होतात. आणि पुन्हा टोकाचे पाऊल उचलतात. अंजनेरी येथे यापूर्वी या जुगारातून कर्जबाजारी झाल्यामुळे एका शेतकरी पुत्राने आत्महत्या केली आहे. खासगी सावकार जुगाराच्या नादी लागलेले असे तरुण हेरतात. त्यांना अव्वाच्या सव्वा व्याजदराने कर्ज देतात. हे कर्ज वसुलीकरण्यासाठी पुन्हा जाच सुरू करतात. जमिनीवर जप्ती आणतात. त्यामुळे आपण आयुष्यात सारेच गमावले, या भावनेतून युवक नैराश्यग्रस्त होत आत्महत्या करतात. त्यामुळे या हा जुगार बंद करावा. खासगी सावकारांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
Mirza Ghalib | जगण्याचं तत्वज्ञान मलमली भाषेत सांगणाऱ्या असदुल्लाह-ख़ाँ-‘ग़ालिब’ का पता…!