सर्वात मोठी बातमी! काल पाठिंबा दिला, आज गायब, ठाकरे गटाच्या शुभांगी पाटील नॉट रिचेबल; राजकीय तर्कवितर्कांना उधाण

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुभांगी पाटील यांना नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत पाठिंबा दिला होता. उद्धव ठाकरे यांना भेटल्यानंतर शुभांगी पाटील यांनी मीडियाशी संवाद साधला होता.

सर्वात मोठी बातमी! काल पाठिंबा दिला, आज गायब, ठाकरे गटाच्या शुभांगी पाटील नॉट रिचेबल; राजकीय तर्कवितर्कांना उधाण
shubhangi patilImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jan 16, 2023 | 1:46 PM

नाशिक: नाशिक पदवीधर मतदारसंघात ठाकरे गटाने पाठिंबा दिलेल्या उमेदवार शुभांगी पाटील या अचानक गायब झाल्या आहेत. शुभांगी पाटील या नॉट रिचेबल असल्याने तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. अर्ज मागे घेण्यासाठी अवघे दोन तास बाकी आहेत. तर दुसरीकडे भाजपचे नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकमध्ये तळ ठोकला आहे. त्यातच शुभांगी पाटील या नॉट रिचेबल झाल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. शुभांगी पाटील या अर्ज मागे घेणार का? असा सवाल या निमित्ताने केला जात आहे.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुभांगी पाटील यांना नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत पाठिंबा दिला होता. उद्धव ठाकरे यांना भेटल्यानंतर शुभांगी पाटील यांनी मीडियाशी संवाद साधला होता. त्यानंतर त्या नाशिकल्या परतल्या. मात्र, नाशिकला गेल्यानंतर त्यांचा फोन बंद आहे. त्यांचा कुणाशीही संपर्क होत नसल्याने तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.

हे सुद्धा वाचा

मंत्री गिरीश महाजन हे कालपासून नाशिकमध्ये तळ ठोकून आहेत. प्रत्येक उमेदवाराला माघार घेण्यासाठी महाजन यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यातील काही उमेदवारांनी माघारही घेतली आहे. मात्र, शुभांगी पाटील नॉट रिचेबल झाल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

शुभांगी पाटील या ठाकरे गटाच्या नेत्यांसोबत अज्ञातस्थळी रवाना झाल्याचंही सांगितलं जात आहे. तर दुसरीकडे त्या कुणासोबत आहेत याची काहीच मिळत नाहीये. त्यामुळे शुभांगी पाटील यांच्या मनात नेमकं काय आहे हे सांगणं कठिण झालं आहे. अर्ज मागे घेण्यासाठी अवघे दोन तास बाकी आहेत. या दोन तासात त्या मीडियासमोर येणार का? असा सवालही केला जात आहे.

शुभांगी पाटील यांनी अर्ज मागे घ्यावा म्हणून भाजपनेही प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठीच महाजन नाशिकमध्ये आले होते. सत्यजित तांबे यांची बिनविरोध निवड करण्यासाठी हे प्रयत्न सुरू असल्याचं सांगितलं जात आहे. तसेच शुभांगी पाटील या कुठे आहेत याची माहितीही ठाकरे गटाकडून अद्याप देण्यात आलेली नाही.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.