Nashik Rain | येवला तालुक्याच्या उत्तर भागात ढगफुटी सदृश्य पाऊस, पिकांचे मोठे नुकसान…
येवला तालुक्यातील उत्तर भागामधील पाटोदा, शिरसगाव लौकि, कातरणीसह परिसरातील गावांमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने मोठ्या प्रमाणात नदी नाल्यांना पुराचे पाणी आल्याने वाहतूक पूर्णपणे बंद होती.
येवला : येवला (Yeola) तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पावसाच्या सरी बरसत आहेत. राज्यात देखील अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस (Heavy rain) सुरू असल्याने धरणातील पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलायं. यामुळे अनेक नद्यांना देखील पूर आलायं. येवला तालुक्याच्या उत्तर भागात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने पिकांचे मोठे नुकसान (Damage) झाले आहे. इतकेच नाही तर ढगफुटी सदृश्य पावसाने पाटोदा – लासलगाव या दोन्ही गावाचा संपर्क तुटला होता. पावसामुळे तालुक्यातील नद्यांना मोठ्या प्रमाणात पूर आल्याने लोकांना घराच्या बाहेर पडणे देखील शक्य होत नव्हते
ढगफुटी सदृश्य पावसाचा फटका पिकांना
मुंबई, कोकण, अमरावती, पुणे आणि मराठवाडा अशा सर्वच ठिकाणी सध्या पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. मात्र, सततच्या पावसामुळे शेतजमिनींचे मोठे नुकसान होत असून पिके देखील पाण्याखाली गेल्याचे चित्र आहे. येवला तालुक्याच्या उत्तर भागात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने पिंकांचे आणि बागांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतामध्ये चिखलच- चिखल बघायला मिळतो आहे.
पाटोदा – लासलगाव या दोन्ही गावाचा संपर्क तुटला
येवला तालुक्यातील उत्तर भागामधील पाटोदा, शिरसगाव लौकि, कातरणीसह परिसरातील गावांमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने मोठ्या प्रमाणात नदी नाल्यांना पुराचे पाणी आल्याने वाहतूक पूर्णपणे बंद होती. तर काही ठिकाणी द्राक्ष बाग व मका पीक पूर्णपणे पाण्याखाली आले. यामुळे या ढगफुटी सदृश्य पावसाने बळीराजाला मोठा फटका बसलायं. पावसामुळे पाटोदा – लासलगाव या दोन्ही गावाचा संपर्क तुटला होता.