विहिरीत कोणीतरी डोकावत असल्याचे पाहिल्यानंतर बिबट्याने जोरात डरकाळी फोडली, मग…
विहिरीत कोणीतरी डोकावत असल्याचे पाहिल्यानंतर बिबट्याने जोरात डरकाळी फोडली, त्यामुळे भयभीत झालेल्या शेतकऱ्यांनी घराकडं धूम ठोकली,
शैलेश पुरोहित, इगतपुरी : इगतपुरी (igatpuri) तालुक्यात एका बिबट्याला (leopard) काल वनविभागाच्या (forest department) पथकाने जीवदान दिले, बिबट्या विहिरीत होता, याची कल्पना कुणालाही नव्हती. शेतकऱ्याला संशय आल्याने त्याने विहीरीत डोकावून पाहिले, त्यानंतर बिबिट्याने जोराचा आवाज केला. त्यानंतर घाबरलेल्या शेतकऱ्यांनी ही माहिती तात्काळ वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. वनविभाग तात्काळ घटनास्थळी दाखल झालं, त्यानंतर वाघाला ताब्यात घेण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले, अखेरीत बिबट्या त्या पिंजऱ्यात गेल्यानंतर साऱ्यांनीच निः श्वास सोडला.
बिबट्याने जोरात डरकाळी फोडली
इगतपुरी तालुक्यातील शेनीत येथे संजय जाधव यांच्या शेतात त्यांची खाजगी विहीर आहे. जाधव हे विहिरीवर गेले असता विहिरीत कोणीतरी असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी वाकून वाहिले असता बिबट्या असल्याचे समजले. विहिरीत कोणीतरी डोकावत असल्याचे पाहिल्यानंतर बिबट्याने जोरात डरकाळी फोडली. ही माहिती त्यांनी गावकऱ्यांना सांगितली. ग्रामस्थांनी एकत्र येऊन वन विभागाच्या कार्यालयात दूरध्वनी द्वारे माहिती दिली.
विहीर सुमारे तीस फूट खोल…
वन परिक्षेत्र अधिकारी केतन बिरारीस,यांच्या मार्गदर्शन खाली वन परिमंडळ अधिकारी भाऊसाहेब राव, वनरक्षक फैज अली सय्यद, राहुल घाटेसाव गोरख बागुल, वाहन चालक मुजाहि्द शेख आदी पिंजरा घेऊन घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर विहिरीमध्ये पिंजरा सोडून बिबट्याला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू झाले. ज्या विहिरीत बिबट्या पडला होता ती विहीर सुमारे तीस फूट खोल होती. विहिरीतील दगडाच्या कपारी वर बिबट्या बसला होता. सोडलेल्या पिंजऱ्यामध्ये येण्यास बिबट्या बाहेर असलेल्या गोंधळामुळे अनुत्सुक होता; मात्र सुमारे एक तास त्यासाठी प्रयत्न सुरू होते. अखेर बिबट्या पिंजऱ्यात बसला. त्यामुळे साऱ्यांनीच निःश्वास सोडला.