Nashik | पोलीस आयुक्तावर दबाब आणणे अयोग्य, ट्रान्सफर होईपर्यंत आदेश मागे नाही; नववर्ष स्वागत समितीला पांडेय यांचे उत्तर

पोलीस आयुक्त दीपक पांडेय म्हणाले की, नववर्ष स्वागत समितीने इथे येऊन परवानगी घ्यायला पाहिजे. माझी ट्रान्सफर होत नाही, तोपर्यंत माझे आदेश मी मागे घेणार नाही. कदाचित माझी ट्रान्सफर झाल्यावर तुम्हाला महत्त्व कळेल. नववर्ष स्वागत समितीने दबाव टाकला. पोलिसांबद्दल आक्षेपार्ह बोलणे कसे सहन करणार, असा सवालही त्यांनी केला.

Nashik | पोलीस आयुक्तावर दबाब आणणे अयोग्य, ट्रान्सफर होईपर्यंत आदेश मागे नाही; नववर्ष स्वागत समितीला पांडेय यांचे उत्तर
दीपक पांडेय, पोलीस आयुक्त, नाशिक.
Follow us
| Updated on: Mar 28, 2022 | 1:31 PM

नाशिकः नाशिकमध्ये कार्यक्रमाला परवानगी देण्यावरून नववर्ष स्वागत समिती आणि पोलीस आयुक्तांमध्ये कलगीतुरा रंगला आहे. त्याचाच पुढचा अंक आज पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत पाहायला मिळाला. पोलीस आयुक्तांवर दबाव आणणे योग्य नाही. तुम्ही इथे येऊन परवानगी घ्यायला पाहिजे. माझी ट्रान्सफर होत नाही, तोपर्यंत माझे आदेश मी मागे घेणार नाही. कदाचित माझी ट्रान्सफर झाल्यावर तुम्हाला माझे महत्त्व कळेल. नववर्ष स्वागत समितीने दबाव टाकला आहे. पोलिसांबद्दल आक्षेपार्ह बोलणे कसे सहन करणार. मी त्यांना बोलावलं, तेव्हा त्यांनी नकार दिला, अशा शब्दांत पोलीस आयुक्त पांडेय यांनी नववर्ष स्वागत समितीला उत्तर दिले. नाशिकमध्ये (Nashik) गुढीपाडव्याचे (Gudhipadwa) सर्व सांस्कृतिक आणि पारंपरिक कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय नववर्ष स्वागत समितीने घेतलाय. पोलिसांच्या (Police) आठमुठ्या धोरणाचा निषेध म्हणून हा निर्णय घेतल्याची माहिती नववर्ष स्वागत समितीचे प्रफुल्ल संचेती आणि नितीन वारे यांनी दिली होती. शिवाय शहरातील सांस्कृतिक कार्यक्रमांना पोलिसांकडून परवानगी देण्यात आडकाठी आणली जात आहे. त्याच्या निषेधार्थ हे पाऊल उचलण्यात आले आहे. त्यामुळे गुढीपाडव्याला शहरात होणारे महारांगोळी, महावादन आणि अंतर्नाद हे कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे त्यानी जाहीर केले होते. नववर्ष स्वागत समितीच्या या आरोपाचा पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी समाचार घेतला.

कायद्यावरच समाज चालतो…

पोलीस आयुक्त म्हणाले, संविधानाच्या तरतुदी व पोलीस अॅक्ट अंतर्गत सार्वजनिक कार्यक्रमासाठी पोलीस आयुक्तांची परवानगी घेणे बंधनकारक आहे. कोरोनाचा आणि परवानगी घेण्याचा काही संबंध नाही. परवानगी बंधनकारक केल्याने शहराला शिस्त लागली. वर्षभरात 833 अर्ज दाखल झाले. त्यापैकी 598 ला परवानगी दिली. कायद्यावरच समाज चालतो. हे नागरिकांनी समजून घ्यावे. लोकहितासाठीच्या दृष्टीने नियमावली जाहीर केली आहे. 17 फ्रेबुवारी 2021 नुसार परवानगी घेणे बंधनकारक आहे.

परवानगी द्यावीच असे नाही…

पोलीस आयुक्त दीपक पांडेय म्हणाले की, प्रत्येक नागरिकांना रस्त्यांचा वापर करण्याचा अधिकार आहे. राजकीय पक्षांना विशेष मुभा दिलेल्या असतात. मात्र, त्यांनी नियमाचे उल्लंघन केल्यास त्याची निवडणूक आयोगाकडे तक्रार करतो. विविध सामाजिक संस्थावर धर्मादाय आयुक्तांची परवानगी घेणे बंधनकारक असते. कोणी अर्ज केला, तर त्यास परवानगी दिलीच पाहिजे असा नियम नाही. पोलीस आयुक्तावर कोणी दबाब आणत असेल, तर ते योग्य नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

मीडियाच्या माध्यमातून चर्चा नको…

पांडेय म्हणाले की, शहरात एकही रास्ता रोको झालेला नाही. परवानगी नाकारण्यात व्यक्तीगत हेतू नाही. शासनाच्या आदेशाप्रमाणेच कार्य करतो. अर्ज दिल्यानंतर सात दिवसांच्या आत परवानगी देण्याच्या प्रयत्न असतो. पोलीस आयुक्त तुमच्या हिताचे निर्णय घेत आहेत. गुढी पाडव्याच्या यात्रोत्सव परवानगीसाठी आयोजकांनी यायला हवे. मीडियाच्या माध्यमातून चर्चा नको, असे आवाहन त्यांनी केले.

आक्षेपार्ह बोलणे सहन करणार नाही…

पोलीस आयुक्त म्हणाले की, इथे येऊन परवानगी घ्यायला पाहिजे. माझी ट्रान्सफर होत नाही, तोपर्यंत माझे आदेश मी मागे घेणार नाही. कदाचित माझी ट्रान्सफर झाल्यावर तुम्हाला महत्त्व कळेल. नववर्ष स्वागत समितीने दबाव टाकला. पोलिसांबद्दल आक्षेपार्ह बोलणे कसे सहन करणार. मी त्यांना बोलावलं, तेव्हा त्यांनी नकार दिला. खासगी संस्था पब्लिक प्लेसवर कार्यक्रम करणार आणि पोलीस आयुक्तांबद्दल चुकीचे बोलत असतील तर काय करणार, असा सवालही त्यांनी केला.

इतर बातम्याः

शिवसेना नेते यशवंत जाधवांनी ‘मातोश्री’ला दिलेल्या 2 कोटी रुपयांची यादीच मिळाली; जाधव म्हणतात, ही तर माझी आई…!

पर्यावरण मंत्र्यांना अंधारात ठेवून वादग्रस्त उड्डाणपुलाला घाईघाईत मान्यता; नाशिकमध्ये पुन्हा आंदोलन धुमसणार!

Special Report | देशातल्या सर्वात मोठ्या लेखकाची ख्यातनाम प्रकाशकांकडून लूट; कोण फोडणार पुस्तकांचा तुरुंग?

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.