Malegaon Road : काय ते रस्ते…. काय ते खड्डे….. सर्व काही नॉट ओके! पहिल्याच पावसात मालेगावच्या रस्त्यांचे तीनतेरा…

महानगरपालिकेत 84 नगरसेवक, 2 विधानसभा सदस्य, पुरेसे प्रशासकीय अधिकारी असून देखील शहराचा विकास मात्र हिरमुसला आहे. येथील बेजबाबदार प्रशासन, लोकपतिनिधींमुळे जनता बेहाल झाली आहे. पावसाळा सुरू झाल्यापासून शहरातील सर्वच रस्त्यांची वाट लागली आहे.

Malegaon Road : काय ते रस्ते.... काय ते खड्डे..... सर्व काही नॉट ओके! पहिल्याच पावसात मालेगावच्या रस्त्यांचे तीनतेरा...
Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jul 21, 2022 | 8:30 AM

मालेगाव : पहिल्याच पावसात मालेगाव (Malegaon) शहरातील रस्त्यांचे तीनतेरा वाजले आहेत. बेजबाबदार प्रशासन, लोकपतिनिधींमुळे जनता बेहाल झाल्याचे चित्र मालेगावमध्ये आहे. मालेगाव शहरातील रस्त्यांची वाट लागली असून वाहनधारकांना रस्त्याने जाताना मोठी कसरत करावी लागते आहे. कुठल्याही शहराचा विकास व्हायचा असेल तर तेथील प्रशासन (Administration) आणि लोकप्रतिनिधी यांची सकारात्मक मानसिकता गरजेची असते. मात्र मालेगाव शहरात उदासिन प्रशासन आणि लोकप्रतिनिधींमुळे रस्त्यांची (Road) चाळण झाली आहे. विशेष म्हणजे पावसाळ्याच्या अगोदर महापालिकेने रस्त्यावरील खड्डे बुजवल्याचा दावा देखील केला होता. मात्र, पाहिल्याच पावसात महापालिकेचे पितळ उघडे पडले आहे.

बेजबाबदार प्रशासन आणि लोकप्रतिनिधींमुळे रस्त्याचे वाजले तीनतेरा

महानगरपालिकेत 84 नगरसेवक, 2 विधानसभा सदस्य, पुरेसे प्रशासकीय अधिकारी असून देखील शहराचा विकास मात्र हिरमुसला आहे. येथील बेजबाबदार प्रशासन, लोकप्रतिनिधीमुळे जनता बेहाल झाली आहे. पावसाळा सुरू झाल्यापासून शहरातील सर्वच रस्त्यांची वाट लागली आहे. पहिल्याच पावसात रस्त्यांची दैना झाल्याने स्त्याने पायी चालणे देखील मुश्कील झाले असून वाहने चालविताना मोठी कसरत करावी लागत आहे.

हे सुद्धा वाचा

रस्त्यांवरील खड्ड्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले

मालेगाव शहरातील सर्वच रस्त्यांची दैना झाली असून अनेक रस्ते चिखलाचे आणि निसरडे झाले आहेत. इतकेच नाही तर रस्त्यांवर मोठं मोठे खड्डे पडल्याने अपघात होण्याचे प्रमाणही वाढले आहे. सोयगाव कॅम्पसारख्या तर काही ठिकाणच्या रस्त्यांनी ये जा करणे देखील मुश्किल झाल्याने त्याचा परिणाम शाळकरी विद्यार्थ्यांवर झाला आहे. पहिल्याच पावसात मालेगावातील रस्त्यांची दैना झाली आहे. त्यामुळे आता शहरातील रस्त्यांबाबत “काय ते रस्ते…. काय ते खड्डे….. सर्व काही नॉट ओके…! असे विनोद सुरू झाले आहेत.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.