Nashik | जलील यांनी MIM चा राजीनामा देऊन NCP मध्ये यावं, भुजबळांचं थेट आवतण
पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, महाविकास आघाडीची सत्ता पाच वर्ष टिकणार आहे. या पुढेही आम्ही एकत्र लढल्यास भाजपने महाराष्ट्राची सत्ता विसरावी. 'एमआयएम'ला भाजपची 'बी' टी म्हणतात. त्यामुळे त्यांची महाविकास आघाडीसोबत घेण्याचा प्रस्ताव आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या समवेत झालेल्या बैठकीत दिला.
लासलगावः ‘एमआयएम’चे खासदार इम्तियाज ललील यांनी पक्षाचा राजीनामा देऊन यावं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या धोरणाप्रमाणं काम करावं. शरद पवार (Sharad Pawar) साहेब त्यांना नक्की घेतील, असा सल्ला पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिला. ते लासलगाव जवळील निफाड तालुक्यातील विंचूर येथे बोलत होते. आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी काल ‘एमआयएम’चे (MIM) खासदार इम्तियाज जलील यांची घेतलेली भेट चांगलीच गाजतेय. या भेटीत उत्तर प्रदेशात तुमच्यामुळे भाजप जिंकली, असा आरोप टोपे यांनी ‘एमआयएम’वर केला. हा आरोप भविष्यात लावला जाऊ नये, म्हणून आम्ही महाविकास आघाडीत सामील होण्याचा प्रस्ताव देतोय, असे आवाहन खासदार जलील यांनी केले. तसेच ‘तुमच्या तीनचाकी रिक्षाला एक चाक जोडा, मोटर कार करा, बघा कशी चालतेय…’ असा खोचक सल्लाही दिला. शिवसेनेने हा प्रस्ताव फेटाळून लावलाय. मात्र, ‘एमआयएम’ला आघाडीत घ्यायचे की नाही याचा निर्णय वरिष्ठ नेतेच घेतील, असे वक्त्यव्य आज राजेश टोपे यांनी केले आहे. टोपे यांच्या या विधानावर अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. तसेच ‘एमआयएम’बाबत ‘राष्ट्रवादी’चा सॉफ्ट कॉर्नर असल्याचेही बोलले जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि पालकमंत्री छगन भुजबळ यांनी खासदार जलील यांनाच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्याचे आवाहन केले आहे.
काय म्हणाले भुजबळ?
पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, महाविकास आघाडीची सत्ता पाच वर्ष टिकणार आहे. या पुढेही आम्ही एकत्र लढल्यास भाजपने महाराष्ट्राची सत्ता विसरावी. ‘एमआयएम’ला भाजपची ‘बी’ टी म्हणतात. त्यामुळे त्यांची महाविकास आघाडीसोबत घेण्याचा प्रस्ताव आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या समवेत झालेल्या बैठकीत दिला. खरे तर इम्तियाज जलील हे ‘एमआयएम’चा राजीनामा देऊन आले, तर त्यांना घ्यायला काहीच हरकत नाही. त्यांनी यावं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या धोरणाप्रमाणं काम करावं. नक्कीच पवार साहेब त्यांना राष्ट्रवादीत घेतील, असे आवाहन भुजबळ यांनी केले.
भाजपने सत्ता विसरावी…
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी महाविकास आघाडीचे 25 आमदार आमच्या संपर्कात असल्याचे वक्तव्य केले आहे. महाविकास आघाडीमध्ये काही आमदार नाराज आहेत का, असा प्रश्न विचारला असता भुजबळ म्हणाले की, हे सरकार पाच वर्षे टिकणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, सोनिया गांधी पवार साहेब यांचे हे सरकार आहे. पाच वर्षानंतर हे तीन पक्ष एकत्रित लढले, तर भाजपने महाराष्ट्रातील सत्ता विसरायला हरकत नाही, असा टोलाही त्यांनी हाणला.
इतर बातम्याः