अरे बाप नाही तुझा काकाच…; अजित पवारांच्या प्रश्नाला जयंत पाटलांचं जोरदार प्रत्युत्तर
Jayant Patil on Ajit Pawar : नाशिमध्ये महाविकास आघाडीची सभा झाली. या सभेत बोलताना जयंत पाटील यांनी अजित पवारांच्या टीकेला उत्तर दिलं आहे. अजित पवारांवर त्यांनी जोरदार निशाणा साधला आहे. नाशितकरांना संबोधित करताना जयंत पाटील काय म्हणाले? वाचा सविस्तर...
राज्यात विधानसभा निवडणूक होतेय. यासाठी प्रचारसभांचा धडाका सुरु आहे. सहा नोव्हेंबरला इंडिया आघाडीची सभा झाली. यात काही गॅरंटी महाराष्ट्रतील जनतेला देण्यात आल्या. यावर यांनी एवढ्या घोषणा केल्यात, हे सगळं कसं पूर्ण करणार? असं अजित पवार यांनी सांगलीत बोलताना म्हटलं. त्याला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं. राज्याचे उपमुख्यमंत्री सांगलीला गेले होते. त्यांनी सांगितलं एवढ्या योजना केल्यात, यांच्या बापालाही पूर्ण करता येणार नाही… अरे बापाला नाही, तुझा काकाच पूर्ण करणार… बापाचा विषयच नाही इथे… काकाच हा सगळा विषय पूर्ण करणार. तुम्ही चिंताच करू नका, असं म्हणत जयंत पाटील यांनी अजित पवारांना प्रत्युत्तर दिलंय.
“मलाही म्हणालेले चल, पण…”
नरेंद्र मोदींनी 70 हजार कोटींचा भ्रष्टाचार काढला आणि सगळी आमची टोळी तिकडे गेली. मला देखील म्हणाले, तुम्ही पण चला, मात्र मी म्हणालो निष्ठा सोडणार नाही. भाजपने ज्यांच्यावर आरोप केले, त्यांना मंत्रिमंडळात घेतलं. 70 हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याची फाईल आर आर पाटील यांच्याकडे आली असेल. त्यांनी सही केली असेल. मात्र त्यानंतर सरकार बदललं, मुख्यमंत्र्यांनी देखील त्यावर सही केली. आणि तेच कागदपत्रे अजित पवारांना मुख्यमंत्र्यांनी बोलावून दाखवले, मात्र त्यावर तेव्हाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सही होती ना…, असं म्हणत अजित पवारांच्या आर. आर. पाटील यांच्याबाबत केलेल्या विधानाला जयंत पाटील यांनी प्रत्युत्तर दिलंय.
लाडकी बहीण योजनेवर भाष्य
लोकसभेआधी बहिणी लाडक्या नव्हत्या. लोकसभेला बहिणीला विरोध होता. लोकसभेनंतर बहिणी लाडक्या झाल्यात. पण आमच्या लाडक्या बहिणी या सावत्र भावांना फसणार नाही. महिला, मुलींवर अत्याचार होतात. बदलापूर प्रकरणात भाजपचे लोक पाठीशी घालण्याचे काम करतात. गणपतराव गायकवाड या पठ्ठ्याने पोलीस ठाण्यात गोळीबार केला. ते तुरुंगात म्हणून भाजपने त्यांच्या पत्नीला उमेदवारी दिली, असं जयंत पाटील म्हणाले.
आमचे उद्योग गुजरातला गेले मात्र मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची हिंमत होत नाही त्या विरोधात बोलायची. मुख्यमंत्र्यांनी मला सांगितलं, काल मी नरेंद्र मोदींना भेटून आलो गुजरातपेक्षा मोठा प्रकल्प महाराष्ट्रात येणार आहे. मोदींनी भोपळा हातात दिला. गुजरात लहान आणि आपल्या मागे असणार राज्य होते. दरडोई उत्पन्नात देखील मागे होते. मोदी आणि फडणवीस आले आणि दोन वर्षात गुजरात पुढे गेलं आणि महाराष्ट्र मागे गेला. यांची कर्तबगारी इतकी दिवाळखोरी आहे, की महाराष्ट्र पहिल्यांदा खाली गेला, असं म्हणत महायुती सरकारच्या कामगिरीवर जयंत पाटील यांनी टीका केलीय.