नाशिक शहरातील काझी गढी धोकादायक अवस्थेत, मनपाचा कानाडोळा, मोठ्या दुर्घटनेची भीती
रायगड, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर जिल्ह्यात दरड कोसळण्याच्या दुर्घटना घडल्या होत्या. राज्यात दरडीच्या घटना घडत असतानाच नाशिक शहरातील प्राचीन काझी गढी देखील धोकादायक झालीये.
नाशिक: महाराष्ट्रात जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीदरम्यान रायगड, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर जिल्ह्यात दरड कोसळण्याच्या दुर्घटना घडल्या होत्या. राज्यात दरडीच्या घटना घडत असतानाच नाशिक शहरातील प्राचीन काझी गढी देखील धोकादायक झालीये. मात्र, याकडे अद्यापही मनपा प्रशासनाचा काना डोळा दिसून येतोय. दरवर्षी प्रमाणे येथील नागरिकांना स्थलांतरांच्या नोटीसा देण्यापलीकडे मनपा प्रशासन काहीच ठोस उपाययोजना करीत नसल्याने याठिकाणी देखील मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जातीय.
मनपा दुर्घटना घडण्याची वाट पाहतेय का?
मनपा प्रशासन अशीच दुर्घटना घडण्याची वाट पाहतेय का असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केलाय.काझी गढी परिसरातील रहिवाशी जीव मुठीत घेऊन जगत आहे. या नागरिकांना राजकारणी आणि मनपा प्रशासनाकडून आश्वासनांव्यतिरिक्त कुठलीच ठोस उपाययोजना करून दिली जात नसल्याने येथील रहिवाशी दहशतीखाली आले आहेत.
दरवर्षी गोदावरी नदीला येणाऱ्या पुराचे पाणी या काझी गढीची अर्धी भींत आपल्या कवेत घेत असते. त्यामुळे येथील मातीचा मोठा भराव वाहून गेल्याने गढीवरील अनेक घरे अधांतरी असलेली दिसत आहे. मात्र,पावसाच्या पाण्याने मातीचा भराव कधी कोसळेल याचा कुठलाच भरवसा नाहीये. त्यासाठी मनपा प्रशासनाने या नागरिकांचे वेळीच स्थलांतर करणे गरजेचे झाले असून वेळीच योग्य पाऊले उचलली गेली नाहीतर मोठ्या दुर्घटनेचा सामना करावा लागणार यात शंका नाही, नाशिक मनपा गटनेते शाह खैरे म्हणाले आहेत.
पर्यटन स्थळांवर गर्दी न करण्याचं आवाहन
नाशिक जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवर गर्दी न करण्याचे नाशिक पोलिसांनी आवाहन केलं आहे. अनेक पर्यटक नियम तोडून पर्यटन स्थळावर पोहोचत असल्याचं दिसून येत आहे. नाशिक शहरालगत असलेल्या सोमेश्वर धबधब्यावर काल पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती. इगतपुरीतील पर्यटनस्थळांवर देखील पर्यटकांची गर्दी दिसून आली होती.
इतर बातम्या:
Nashik Kazi Gadhi danger condition many people live in fear of bad incident