Nashik | सुपरवायझरच्या जाचाला कंटाळून घंटागाडी कर्मचाऱ्याची आत्महत्या, व्हाट्सअपवर धक्कादायक खुलासा!
किरण पुराने यांनी आत्महत्या केल्याची घटना सकाळी उघडकीस आली. या आत्महत्येच्या घटनेनंतर मृत घंटागाडी कर्मचाऱ्याचे नातेवाईक आक्रमक झाले आहेत. मॅसेजमध्ये नामोल्लेख केलेल्या संशयित सुपरवायझरला अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा आक्रमक पवित्रा नातेवाईकांनी घेतला आहे.
मुंबई : नाशिकमध्ये (Nashik) घंटागाडी कर्मचाऱ्याने सुपरवायझरच्या जाचाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आलाय. किरण पुराने असे आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. आत्महत्या (Suicide) करण्यापूर्वी किरण पुराने या कर्मचाऱ्याने घंटागाडी सुपरवायझर आपल्याकडे ठराविक रक्कमेची मागणी करत असल्याचा संदेश व्हाट्सअपवर शेअर केला आहे. इतकेच नव्हेतर किरणने आत्महत्या यामुळेच करत असल्याचे देखील लिहिले आहे. सुपरवायझरच्या (Supervisor) जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याने नाशिक शहर हादरले आहे.
व्हाट्सअपवर धक्कादायक खुलासा
किरण पुराने यांनी आत्महत्या केल्याची घटना सकाळी उघडकीस आली. या आत्महत्येच्या घटनेनंतर मृत घंटागाडी कर्मचाऱ्याचे नातेवाईक आक्रमक झाले आहेत. मॅसेजमध्ये नामोल्लेख केलेल्या संशयित सुपरवायझरला अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा आक्रमक पवित्रा नातेवाईकांनी घेतला आहे. यानंतर जिल्हा शासकीय रुग्णालयात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले असून उपनगर पोलिसांच्या कारवाईकडे नातेवाईकांचं लक्ष लागले आहे.
नातेवाईकांचा आक्रमक पवित्रा
आत्महत्ये प्रकरणात आता पोलिसांनी पुढील तपास करण्यास सुरूवात केलीये. किरण पुराने यांनी आत्महत्या नेमकी का केली, सुपरवायझरमध्ये आणि किरणमध्ये नेमक्या कोणत्या पैसांवरून वाद होता, हे सर्व आता तपासले जाणार आहे. मात्र, संशयित सुपरवायझर अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाहीत या नातेवाईकांच्या पवित्र्यानंतर काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.