TV9 Marathi Impact: लासलगावात स्त्री शक्तीचा विजय, कांदा लिलावात सहभागी होण्यास व्यापाऱ्यांची सहमती

लासलगाव बाजार समितीतील कांदा लिलावात सहभागी होण्यासाठी व्यापाऱ्यांनी बैठकीत नाफेडच्या कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर सहमती दर्शवली. Nashik Lasalgaon APMC Onion traders

TV9 Marathi Impact: लासलगावात स्त्री शक्तीचा विजय, कांदा लिलावात सहभागी होण्यास व्यापाऱ्यांची सहमती
संग्रहित छायाचित्र.
Follow us
| Updated on: Jun 04, 2021 | 4:13 PM

नाशिक: आशियातील कांद्याची अग्रेसर बाजार समितीमध्ये कृषी साधना महिला शेतकरी संस्थेवरुन व्यापाऱ्यांनी कादा लिलालावत सहभागी न होण्याचा निर्णय घेतला होता. टीव्ही 9 मराठीनं याबाबत वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर व्यापाऱ्यांनी त्यांची भूमिका बदलली आहे. अखेर विंचूर येथील कृषी साधना महिला शेतकरी संस्थेला लासलगाव बाजार समितीतील कांदा लिलावात सहभागी होण्यासाठी व्यापाऱ्यांनी बैठकीत नाफेडच्या कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर सहमती दर्शवली. (Nashik Lasalgaon APMC Onion traders ready for starting auction and agree for women traders participation)

नेमके प्रकरण काय?

आशिया खंडातील कांद्याची अग्रसर बाजारपेठ असलेल्या लासलगाव बाजार समितीच्या सभापती व उपसभापती महिला आहेत. लासलगाव बाजार समितीत लायसन धारक असलेल्या विंचूर येथील कृषी साधना महिला शेतकरी संस्थेला विरोध दर्शवत व्यापाऱ्यांनी कांदा लिलावात सहभागी न होण्याचा निर्णय गुरुवारी घेतला होता. लासलगाव व्यापारी असोसिएशनचे सभासद नसल्याने कांदा लिलावात सहभागी होता येणार नसल्याचे कारण देत कांदा व्यापाऱ्यांनी विरोध दर्शवत कांदा लिलावावर बहिष्कार घातला. गुरुवारी या वादामुळे कांद्याचे लिलाव ठप्प झाले होते.

व्यापाऱ्यांनी भूमिका बदलली

आज लासलगाव बाजार समितीच्या मुख्यालयात व्यापारी, बाजार समिती प्रशासक व कृषी साधना महिला शेतकरी संस्थेच्या चेअरमन यांची बैठक झाली. या बैठकीत नाफेडच्या कांदा खरेदीचे बिले सर्व कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर व्यापाऱ्यांनी नाफेडची खरेदी सुरू असेल तो पर्यंत कांद्याचे लिलाव करता येईल, अशी भूमिका घेतली. या तोडग्यावर व्यापाऱ्यांनी कृषी साधना महिला शेतकरी संस्थेला कांदा लिलावात सहभागी होण्याची परवानगी दिली.

नाफेडकडून कांदा खरेदी सुरु

लासलगाव बाजारपेठेत गेल्या वर्षी केंद्र सरकारने आधारभूत किंमत योजनेंतर्गत मे महिन्यात कांदा खरेदी सुरू केली होती. ऑगस्टपर्यंत 31 हजार 694 क्विंटल कांद्याची खरेदी कमाल 1187 रुपये, किमान 532 रुपये तर सर्वसाधारण 950 रुपयाने खरेदी केली होती. मात्र यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने नाशिक जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट आल्याने नाफेडमार्फत केंद्र सरकारची कांदा खरेदी तब्बल एक महिना लेट सुरू झाली. आज लासलगाव बाजार समितीतून नाफेडसाठी दोन वाहनांतून कांद्याची खरेदी करण्यात आली, कमाल 2057 तर किमान 1850 इतका बाजार भाव मिळाला आहे.

गुरुवारी काय घडलं?

लासलगाव बाजार समितीचे लायसन धारक असलेल्या विंचूर येथील कृषी साधना शेतकरी संस्थेच्या वतीने नाफेड साठी महिलेने खरेदी सुरू करताच पुरुष प्रधान असलेल्या कांदा व्यापाऱ्यांनी काढता पाय घेतला होता.

संबंधित बातम्या:

लासलगावचे कांदा लिलाव ठप्प, बाजार समिती प्रशासनाच्या भूमिकेवर शेतकरी संतप्त

बाजारपेठेतील गर्दी कमी करा, अन्यथा कडक निर्बंध, नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांसह पालिका आयुक्तांचा इशारा

(Nashik Lasalgaon APMC Onion traders ready for starting auction and agree for women traders participation)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.