Nashik: नाशिकमध्ये महंत अनिकेत शास्त्रींच्या आश्रमावर समाजकंटकांकडून दगडफेक
नाशिकमध्ये (Nashik) महंत अनिकेत शास्त्री (Aniket Shastri) यांच्या आश्रमावर मध्यरात्री समाजकंटकांनी दगडफेक केल्याची घटना घडलीय. याप्रकरणी अनिकेत शास्त्री देशपांडे यांनी उपनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलीय.
नाशिकः नाशिकमध्ये (Nashik) महंत अनिकेत शास्त्री (Aniket Shastri) यांच्या आश्रमावर मध्यरात्री समाजकंटकांनी दगडफेक केल्याची घटना घडलीय. याप्रकरणी अनिकेत शास्त्री देशपांडे यांनी उपनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलीय. याधीही या आश्रमावर दगडफेक करून गो-शाळेवर मद्याच्या बाटल्या फेकल्याची घटना घडली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी ब्राह्मण (Brahmin) समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यावरून राज्यभर आंदोलन झाले. मिटकरींच्या या वक्तव्याचा अनिकेत शास्त्री देशपांडे यांनी निषेध नोंदवला. त्यांच्याविरोधात उपनगर पोलीस ठाण्यात निवेदनही दिले. त्या पार्श्वभूमीवर हा हल्ला झाल्याचा संशय अनिकेत शास्त्री यांनी व्यक्त केला आहे. दगडफेकीच्या घटनेनंतर महंतांच्या भक्तांनी त्यांची भेट घेतली. या प्रकरणी पोलिसांत तक्रार देण्यात आली. त्यानुसार पोलिसांनी तपासाला वेग दिला असून, लवकरच समाजकंटकांना बेड्या ठोकू, असे आश्वासन दिले आहे.
घटना वारंवार सुरू
महंत अनिकेत शास्त्री यांच्या आश्रमावर हल्ला करण्याच्या घटना वारंवार सुरू आहेत. यापूर्वीही येथील गोशाळेवर दगडफेक झाली. त्यानंतर समाजकंटकांनी दारूच्या बाटल्या फेकल्या. याप्रकरणीही महंतांना पोलिसांना समाजकंटकांना बेड्या ठोकण्याची मागणी केली होती. त्यानंतर हा प्रकार पुन्हा एकदा घडल्याने परिसरातील वातावरणही दूषित होत आहे.
आवाज दाबण्याचा प्रयत्न
आमदार अमोल मिटकरी यांनी वादग्रस्त वक्तव्य केले. त्याचा निषेध म्हणून आपण पुढे आलो. पोलिसांना निवेदन दिले. त्यानंतर ही दगडफेक झाली. आपला आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे. पोलिसांनी या समाजकंटकांवर लवकरात लवकर कारवाई करावी, अशी मागणी महंत अनिकेत शास्त्री यांनी केली आहे. इतर बातम्याः
Mirza Ghalib | जगण्याचं तत्वज्ञान मलमली भाषेत सांगणाऱ्या असदुल्लाह-ख़ाँ-‘ग़ालिब’ का पता…!