धावत सुटलेल्या वळूंची दुचाकीला जोराची धडक. एक जण गंभीर जखमी, थरार सीसीटीव्हीत कैद
मालेगाव शहरात या आगोदर सुध्दा अशा पद्धतीच्या अनेक घटना घडल्या आहेत. दोन वळूंच्या भांडणाचा परिणाम थेट नागरिकांवर होत आहेत.
![धावत सुटलेल्या वळूंची दुचाकीला जोराची धडक. एक जण गंभीर जखमी, थरार सीसीटीव्हीत कैद धावत सुटलेल्या वळूंची दुचाकीला जोराची धडक. एक जण गंभीर जखमी, थरार सीसीटीव्हीत कैद](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2023/04/17152636/malegaon-news.jpg?w=1280)
मनोहर शेवाळे, मालेगाव : सटाणा शहरात (Satana City) मोकाट जनावरांनी धुमाकूळ घातला असून रोज कुठे न कुठे मोकाट वळू एकमेकांना भिडतात. त्यामुळे नागरिकांमध्ये भीती पसरून पळापळ होते. अशा पद्धतीची एक घटना शहरातील चावडी चौकात (Chawadi) घडली असून धावत सुटलेल्या दोन वळूंनी दुचाकीवर जाणाऱ्यांना जोरदार धडक दिली. त्यात एक जण गंभीर जखमी झाला आहे. ज्या ठिकाणी ही घटना घडली तेथे लहान बाळाला कडेवर घेऊन एक महिला उभी होती, वळू (malegaon news) धावत येत असल्याचे दिसताच ती बाजूला असलेल्या एका शेडमध्ये गेली आहे.
चतूरपणामुळे दोघे मायलेक वाचले
महिलेच्या चतूरपणामुळे दोघे मायलेक वाचले. क्षणाचाही विलंब झाला असता, तर कदाचित मोठा अनर्थ घडला असता. काळजाचा ठोका चुकविणारी ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून या अगोदर देखील अशा घटना घडल्या आहेत. त्यामुळे पालिका प्रशासनाने मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे. शहरात अनेकदा अशा पद्धतीने दोन जनावरांध्ये लागलेल्या भांडणाचा त्रास नागरिकांना अधिक झाला आहे.
![Image](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2022/07/19203506/DHFL-and-CBI.jpg)
![Image](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2022/07/19201250/sanjay-raut-1-7.jpg)
![Image](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2022/07/19200539/ramdas-kadam-2-1.jpg)
मालेगाव शहरात या आगोदर सुध्दा अशा पद्धतीच्या अनेक घटना घडल्या आहेत. दोन वळूंच्या भांडणाचा परिणाम थेट नागरिकांवर होत आहेत. दोन वळूंमध्ये भांडण लागल्यानंतर अनेकदा इतर गोष्टींचं सुध्दा नुकसान झालं आहे. अनेकदा वळू रस्त्यात बसलेले असतात. त्यामुळे गाड्या जाण्यास मोठी अडचण निर्माण होते. काल वळूंची लागलेली धडक इतकी जोराची होती, की तिथं असणाऱ्या लोकांनामध्ये भीती निर्माण झाली. त्याचबरोबर प्रशासनाने वळूला ताब्यात घ्यावे अशी मागणी करण्यात आली आहे.