खासगी रुग्णालयांविरोधात नाशिकचे महापौर आक्रमक, बिलांमध्ये तफावत आढळल्यास मान्यता रद्द करण्याचा इशारा

नाशिकच्या वोकहार्ट रुग्णालयात बिलाचा मुद्दा समोर आल्यानंतर महापौर सतीश कुलकर्णी चांगलेच आक्रमक झाले आहेत. Nashik Mayor Satish Kulkarni

खासगी रुग्णालयांविरोधात नाशिकचे महापौर आक्रमक, बिलांमध्ये तफावत आढळल्यास मान्यता रद्द करण्याचा इशारा
सतिश कुलकर्णी, नाशिक
Follow us
| Updated on: May 28, 2021 | 2:21 PM

नाशिक: नाशिकच्या वोकहार्ट रुग्णालयात बिलाचा मुद्दा समोर आल्यानंतर महापौर सतीश कुलकर्णी चांगलेच आक्रमक झाले आहेत. वाढीव बिलाबाबत तक्रार असल्यास आता हॉस्पिटल विरोधातील तक्रार थेट महापौरांना कळवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. नाशिक मधील अवाजवी बिल आकारणाऱ्या खासगी रुग्णालयांच्या विरोधात महापौर आक्रमक झाल्याचं चित्र आहे. (Nashik Mayor Satish Kulkarni gave warning to Hospitals regarding extra bills)

मान्यता रद्द करणार

नाशिकचे महापौर सतीश कुलकर्णी यांनी खासगी रुग्णालयांच्या बिलामध्ये तफावत आढळल्यास कारवाई करण्याचा इशारा दिला होता. बिलामध्ये तफावत आढळल्यास थेट रुग्णालयाची मान्यता रद्द करण्यात येईल, असं देखील कुलकर्णी यांनी सांगितले आहे.

महापौर निवासस्थानी हेल्पलाईन सेंटर स्थापन

खासगी रुग्णालयांच्या बिलांसदर्भातील काही अडचणी किंवा तक्रारी असल्यास महापौरांनी त्यांच्याशी संपर्क साधण्याचं आवाहन केलं आहे. यासाठी महापौरांच्या निवासस्थानी हेल्पलाईन सेंटर स्थापन करण्यात आलं आहे. नागरिकांनी हेल्पलाईन सेंटरशी संपर्क साधून तक्रार नोंदवण्याचं आवाहन करण्यात येणार आहे. ज्या रुग्णालयांच्या बिलांमध्ये तफावत आढळेल त्यांच्यावर मान्यता रद्दची कारवाई करु, असा इशारा देखील कुलकर्णी यांनी दिला आहे.

महापौरांचा रुग्णांची लूट थांबण्याचा इशारा

दरम्यान दुसरीकडे नाशिकच्या महापौरांनी यापूर्वीच खासगी रुग्णालयांकडून सुरू असलेली रुग्णांची लूट तात्काळ थांबवावी.अन्यथा हॉस्पिटलची मान्यता रद्द करण्यात येईल असा इशारा नाशिकचे महापौर सतीश कुलकर्णी यांनी रुग्णालयांना दिला आहे.

महापालिकेचे ऑडिटर काय करतात? शिवसेना आक्रमक

नाशिकच्या खासगी हॉस्पिटलच्या विरोधात सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र भावे यांनी अर्धनग्न होत आंदोलन केलं. याप्रकरणी पोलिसांनी भावेंना ताब्यात घेतल्यानंतर, सर्वसामान्य नाशिककर जनतेच्या दबावामुळे पोलिसांना भावेंवर कोणतीही कारवाई न करता त्यांना सोडून द्यावा लागलं. मात्र, सर्वसामान्यांचा मिळालेला पाठिंबा लक्षात घेत, शिवसेनेने देखील आता या प्रकरणात उडी घेतली आहे. महापालिकेने नियुक्त केलेले खासगी रुग्णालयांचं ऑडिट करणारे ऑडिटर काय करत आहेत? असा संतप्त सवाल शिवसेनेचे विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी उपस्थित केला आहे.

संबंधित बातम्या:

नाशिकमध्ये होम आयसोलेशन रद्द होणार? पालिका आयुक्तांचे संकेत; म्युकरमायकोसिसचा धोका वाढला

नाशिकच्या वोकहार्ट हॉस्पिटलची चौकशी होणार, वेळ पडल्यास मान्यताही रद्द करु- महापौर

(Nashik Mayor Satish Kulkarni gave warning to Hospitals regarding extra bills)

छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.