पूरग्रस्तांसाठी नाशिक मनसे मैदानात, चिपळूणच्या नागरिकांना मदतीसाठी मनसे कार्यालयाचं वॉर रुममध्ये रुपांतर
चिपळूण शहरातील नागरिकांच्या मदतीसाठी राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटना पुढाकार घेत आहेत. पूरग्रस्त आणि दरडग्रस्त भागाला मदत करण्यासाठी मनसेनं देखील पुढाकार घेतला आहे.
नाशिक: महाराष्ट्रातील पुरस्थितीचा सर्वाधिक फटका चिपळूण शहराला बसला आहे. चिपळूण शहरातील नागरिकांच्या मदतीसाठी राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटना पुढाकार घेत आहेत. पूरग्रस्त आणि दरडग्रस्त भागाला मदत करण्यासाठी मनसेनं देखील पुढाकार घेतला आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांनी विविध ठिकाणाहून मदत पाठवायला सुरुवात केली आहे. नाशिक जिल्ह्यातील मनसे देखील मदतकार्यासाठी सक्रिय झाली आहे. मनसेच्या वतीनं चिपळूणवासियांसाठी मदत पाठवण्याचं काम सुरु आहे.
चिपळूणवासियांच्या मदतीसाठी नाशिक मनसे मैदानात
चिपळूण मध्ये आलेल्या महापुरात अडकलेल्या लोकांच्या मदतीसाठी नाशिक मनसे मैदानात उतरली आहे.मनसेच्या वतीने चिपळूणवासियांसाठी मोठ्या प्रमाणात मदत पाठवली जाते आहे.नाशिकच्या मनसे कार्यालयाच सध्या वॉर रूमचं स्वरूप आलं आहे.
वर्सोवा येथील मनसे शाखेकडून मदत
वर्सोवा येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेना मदतीसाठी पुढे आली आहे. मनसेतर्फे कोकण, महाड, चिपळूण येथे रुग्णवाहिकांमधून कपडे, खाण्यापिण्याची सामग्री तसेच वैद्यकीय कीट पाठविण्यात आल्या आहेत.
पूरग्रस्तांसाठी मनसे सरसावली
सांगली, सातारा, कोल्हापूर तसेच सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये पूर आला आहे. या ठिकाणी शेकडो घरे पाण्याखाली गेली आहेत. या पुरामुळे अनेक नागरिकांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. पूर, मुसळधार पाऊस तसेच दरडी कोसळल्यामुळे येथे मोठे नुकसान झाले आहे. घरच नष्ट झाल्यामुळे येथील नागरिकांना अन्न, वस्त्र आणि निवारा यासारख्या मुलभूत गरजांसाठी भटकावे लागत आहे. हीच गोष्ट लक्षात घेऊन मनसेने या पूरग्रस्तांना मदत करण्याचे ठरवले आहे.
मनसेतर्फे वैद्यकीय कीटसुद्धा पाठवण्यात आल्या
वर्सोवा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने कोकण, महाड, चिपळूण येथील लोकांना मदत पाठवण्यात आली आहे. त्यासाठी रुग्णवाहिकांमधून कपडे, खाण्यापिण्याची सामग्री मनसेतर्फे देण्यात आली आहे. तसेच पुरात जखमी झालेल्या नागरिकांसाठी मनसेतर्फे वैद्यकीय कीटसुद्धा पाठवण्यात आल्या आहेत.
गरजेनुसार आवश्यक वस्तू पाठवल्या जाणार
या मदतीविषयी बोलताना “साहित्य पाठविण्यासाठी पहिली रुग्णवाहिका रवाना झाली आहे. तेथे गेल्यावर माझी टीम गरजेनुसार आवश्यक ती सामग्री पाठवेल,” अशी माहिती वर्सोवा येथील मनसेचे पदाधिकारी सचिन गाड़े यांनी दिली.
इतर बातम्या:
पूरग्रस्तांसाठी वर्सोवा मनसे सरसावली; कोकण, महाड, चिपळूणकडे कपडे, खाण्याची सामग्री रवाना
आरक्षण नाकारलं तर भारत कधीही एक राष्ट्र बनू शकणार नाही : ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे
Nashik MNS sent help to flood affected peoples of Chiplun during Maharashtra Flood Affected area