ठाकरेंचा शिंदेंना पहिला मोठा धक्का; ‘तो’ खासदार पुन्हा परतीच्या मार्गावर?

MP Hemant Godase May reinter in Shivsena Uddhav Thackeray Group : शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पहिला मोठा धक्का देण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. शिंदे गटातील खासदार पुन्हा परतीच्या मार्गावर असल्याची चर्चा होत आहे. वाचा सविस्तर...

ठाकरेंचा शिंदेंना पहिला मोठा धक्का; 'तो' खासदार पुन्हा परतीच्या मार्गावर?
uddhav thackeray and eknath shinde
Follow us
| Updated on: Feb 28, 2024 | 8:49 AM

चंदन पुजाधिकारी, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी,  नाशिक | 28 फेब्रुवारी 2024 : 2022 ला एकनाथ शिंदे यांनी आपल्या समर्थक आमादारांसोबत बंड केलं. तेव्हा त्यांच्यासोबत शिवसेनेचे अनेक नेते शिंदेंसोबत गेले. आमदार खासदारांपासून ते पक्षातील पदाधिकाऱ्यांनीही एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व स्विकारत शिंदे गटात जाणं पसंत केलं. बंडानंतर आतापर्यंत ठाकरे गटातील अनेक नेते एकामागोमाग एक शिंदे गटात सामील झाले. आता पहिल्यांदाच उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का देण्याच्या तयारीत असल्याचं दिसतं आहे. कारण एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेला एक खासदार पुन्हा ठाकरे परतण्याची शक्यता आहे.

शिंदे गटाचे खासदार ठाकरेंच्या संपर्कात?

लोकसभा निवडणूक तोंडावर आहे. अशात काही पक्षांतरं होतानाही दिसत आहेत. महाविकास आघाडीतील पक्षांचे नेते महायुतीत सामील होताना दिसत आहेत. अशातच आता शिंदे गटातील बडा नेता पुन्हा ठाकरे गटात परतणार असल्याची चर्चा नाशिकच्या राजकीय वर्तुळात होत आहे. कारण खासदार हेमंत गोडसे हे पुन्हा शिवसेना उद्धव ठाकरे गटात येण्याची शक्यता आहे. तशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.

कोण आहे हा खासदार?

खासदार हेमंत गोडसे पुन्हा ठाकरे गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा होत आहे. त्याला कारण ठरलं आहे ते ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांनी जाहीर सभेत केलेला गौप्यस्फोट आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हेमंत गोडसे मिलिंद नार्वेकरांना भेटत आहेत. हेमंत गोडसेंकडून नार्वेकर यांच्यामार्फत ठाकरे गटात एंट्रीचा प्रयत्न सुरु आहे, असा गौप्यस्फोट बडगुजर यांनी केला आहे. त्यानंतर गोडसे ठाकरे गटात येणार का?

हेमंत गोडसे कोण आहेत?

हेमंत गोडसे हे नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. पुणे विद्यापीठाचे सिनेट सदस्यही ते राहिले आहेत. नाशिक जिल्हा परिषदेचं सदस्य होत त्यांनी आपल्या राजकारणाची सुरुवात केली. 2014 ला ते पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले. 2019 ला ते पुन्हा एकदा खासदार झाले. दरम्यान शिवसेनेत येण्याआधी ते मनसे पक्षाचे सदस्य होते. नाशिकच्या राजकारणात त्यांचं मोठं प्रस्थ आहे. त्यामुळे गोडसे जर ठाकरे गटात आले तर महायुतीचं नुकसान होण्याची शक्यता आहे. तर ठाकरेंना मात्र बळ मिळण्याची शक्यता आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.