नाशिक महापालिका आयुक्तांचा नगरसेवकांना दणका, मोफत लसीकरणाच्या पोस्टरवर कारवाई, नेमकं प्रकरण काय?
नाशिक शहारत लसीकरण केंद्रांवर नगरसेवकांनी लावलेले पोस्टर हटवण्यात आले आहेत. महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी नगरसेवकांना यानिमित्तानं चांगलाच दणका दिला आहे.
नाशिक: कोरोना लसीकरणाचा कार्यक्रम सध्या सर्वत्र सुरु आहे. लसीकरणाचा खर्च केंद्र सरकारकडून केला जात आहे. नाशिक शहारत लसीकरण केंद्रांवर नगरसेवकांनी लावलेले पोस्टर हटवण्यात आले आहेत. महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी नगरसेवकांना यानिमित्तानं चांगलाच दणका दिला आहे. लसीकरण केंद्रांवरील आणि शहरातील चौकाचौकात लावण्यात आलेले ‘मोफत लसीकरण’ चे फलक हटवण्यात आले आहेत. (Nashik Municipal Corporation Commissioner Kailas Jadhav order to remove posters of Free Vaccination by corporators )
नगरसेवकांकडून शासनाची दिशाभूल होत असल्याचा आरोप
कोरोना प्रतिबंधक लसींच्या लसीकरणाचा खर्च शासनाकडून केला जात आहे. शासन पैसे भरत असल्याने नगरसेवकांकडून मोफत लसीकरणाचे पोस्टर लावल्यानं नागरिकांची दिशाभूल होत असल्याचा आरोप देखील करण्यात आला होता. महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी लसीकरणाच्या नावाखाली स्वतःचा प्रचार थांबवा, असा इशारा सर्वपक्षीय नगरसेवकांना दिलेला आहे. लसीकरणाच्या पोस्टरच्या निमित्तानं नाशिककरांना महापालिका आयुक्तांच्या आक्रमकतेचं दर्शन झालं आहे.
आयुक्तांचा सर्वपक्षीय नगरसेवकांना स्पष्ट इशारा
नाशिक शहरातील चौकाचौकात लावलेले मोफत लसीकरणानिमित्त नगरसेवकांच्यावतीनं लावण्यात आलेल बॅनर आयुक्तांनी हटवले आहेत. लसीकरणाच्या जाहिरातींवरून नगरसेवक आयुक्त आमने सामने आल्याचं पाहायला मिळालं आहे.
नाशिक जिल्ह्यावर दुष्काळाचं सावट
नाशिक जिल्ह्यावर दुष्काळाचं तर शहरावर पाणी कपातीचे संकट ओढावण्याची शक्यता आहे. पावसाने ओढ दिल्याने जिल्ह्यातील धरणातील पाणी पातळी खालावली आहे. गंगापूर धरण समूहात सरासरी 36 टक्के इतका पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. धरण समूहातील काही बंधारे कोरडेठाक पडलेले आहेत. पुढच्या 15 दिवसात पाऊस न झाल्यास शहरावर पाणी कपातीचं संकट ओढावण्याती शक्यता आहे. वरुणराजा प्रसन्न न झाल्यास नाशिककरांवर पाणीबाणी ओढावण्याची शक्यता आहे.
नाशिक महापालिकेला कोरोना संकटाचा मोठा फटका बसल्याचं दिसून आलं आहे. नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत महापालिकेच्या उत्पन्नात 150 कोटींची घट आलेली आहे. आर्थिक वर्षाअखेर तीनशे कोटींची घट होण्याची भीती असल्यानं प्रशासन खडबडून जागे झालं आहे. महापालिकेकडून नगरसेवक निधी आणि विकास कामांच्या निधीला 25 टक्के कात्री लागण्याची शक्यता आहे. यामुळे ऐन निवडणुकांच्या तोंडावर नगरसेवकांची कोंडी होण्याची शक्यता आहे. अत्यावश्यक कामांनाचं प्राधान्य देण्याच्या सूचना आयुक्त कैलास जाधव यांनी दिल्या आहेत.
इतर बातम्या:
नाशकात बिबट्याचा धुमाकूळ, 13 बकऱ्यांचा फडशा, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर यांची आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती
(Nashik Municipal Corporation Commissioner Kailas Jadhav order to remove posters of Free Vaccination by corporators )