Nashik मध्ये महापालिकेचा धूमधडाका; 579 घरांना जप्ती वॉरंट, 127 नळ कनेक्शन कापले
नाशिक महापालिकेच्या पाणीपट्टीची थकबाकी 122.83 कोटींच्या वर गेलीय. घरपट्टीची थकबाकी 365.40 कोटींवर गेलीय. एकूण 488.23 कोटींच्या थकबाकीचा डोंगर महापालिकेच्या समोरय. नाशिक महापालिकेने 2021-22 आर्थिक वर्षात घरपट्टीतून 150 कोटींची वसुली करण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे.
नाशिकः अखेर प्रशासक (Administrator) राज आल्यानंतर नाशिक (Nashik) महापालिका (Municipal Corporation)आक्रमक झाली असून, 579 घरांना जप्ती वॉरंट बजावूले असून, चक्क 127 नळ कनेक्शन कापण्यात आले आहेत. महापालिकेच्या प्रमुख उत्पन्नाचे स्त्रोत असलेली घटपट्टी आणि पाणीपट्टी भरण्यासाठी नागरिकांनी अक्षरशः पाठ फिरवलीय. महापालिकेच्या या दोन्ही विभागांनी वेळोवेळी सूट देऊनही ग्राहकांनी थकबाकी भरण्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे या करचुकव्यांवर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आता शंभर टक्के वसुलीसाठी करविभागाने दंड थोपटले असून, बड्या थकबाकीदारांची यादी तयार करण्यात आलीय. जप्तीच्या नोटीसा बजावण्यासह कारवाई सुरू करण्यात आलीय. खरे तर नागरिकांनी कर भरायला नकार दिल्याने महापालिकेची आर्थिक अवस्था बिकट झाली होती. विशेष म्हणजे महापालिका निवडणुका तोंडावर आल्याने सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही पक्षांनी करवसुलीसाठी जोर द्यावा, यासाठी प्रयत्न केले नव्हते. मात्र, विद्यमान महापौर आणि उपमहापौरांचा कार्यकाळ संपल्याने 14 मार्चपासून नाशिक महापालिकेवर प्रशासक राज आले आहे. महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी पालिकेच्या कारभाराची सूत्रे हाती घेताच पहिले प्राधान्य महापालिकेची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी दिले आहे.
थकबाकीचा डोंगर
नाशिक महापालिकेच्या पाणीपट्टीची थकबाकी 122.83 कोटींच्या वर गेलीय. घरपट्टीची थकबाकी 365.40 कोटींवर गेलीय. एकूण 488.23 कोटींच्या थकबाकीचा डोंगर महापालिकेच्या समोरय. नाशिक महापालिकेने 2021-22 आर्थिक वर्षात घरपट्टीतून 150 कोटींची वसुली करण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे. आतापर्यंत 107 कोटींची वसुली झालीय. त्यात मागील थकबाकी 400 कोटींवर गेलीय. नाशिक महापालिका हद्दीत 4 लाख 55 हजार मिळकतीयत. त्यात पाचशे चौरस फुटापर्यंत बहुतांश मध्यवर्गीय आहेत. मात्र, एकीकडे नाशिक महापालिकेची जकात रद्द झाल्यानंतर घरपट्टी हेच उत्पन्नाचे प्रमुख साधन आहे.
लेखापरीक्षकांनीही ठेवले बोट
नाशिक महापालिकेचा कर थकवणारे 850 बडे थकबाकीदार आहेत. त्यांच्याकडे एकूण 40 कोटी रुपयांची थकबाकी आहे. ही रक्कम वसूल करण्यासाठी महापालिकेने कंबर कसल्याचे समजते. सध्या महापालिकेची आर्थिक स्थिती म्हणावी तितकी चांगली नाही. मात्र, तरीही घरपट्टी आणि पाणीपट्टी वसुली करण्यात दिरंगाई होताना दिसते आहे. यावर लेखापरीक्षकांनी यापूर्वीच बोट ठेवले आहे. त्यामुळे ऐन महापालिका निवडणुकीच्या पूर्वी ही कारवाई सुरू झाली आहे. महापालिकेने पाणीपट्टी आणि घरपट्टी बाबत अभय योजना जाहीर केली होती. मात्र, नागरिकांनी याकडेही पाठ फिरवली आहे.
इतर बातम्याः