Nashik Municipal Corporation | नाशिक महापालिकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, 318 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू
318 जागांसाठी होणाऱ्या भरतीसाठी 6 सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहेत. या भरती प्रक्रियेमध्ये अर्ज आॅनलाईन पध्दतीने करता येणार आहे. भरती प्रक्रियेतील अर्ज पाठवण्यासाठी जिल्हा रुग्णालय त्र्यंबकरोड हा पत्ता देण्यात आलायं.
नाशिक : नाशिक महापालिकेमध्ये (Nashik Municipal Corporation) विविध विभागांमधील पदांसाठी मोठी भरती प्रक्रिया करण्यात येत आहे. तब्बल 318 जागा भरण्यात येणार असून नाशिक महापालिकेत नोकरी करू इच्छितांसाठी ही एक सुवर्णसंधीच म्हणावी लागणार आहे. नाशिक (Nashik) महापालिकेत आरोग्य विभागात विविध पदांच्या 318 जागांसाठी भरती होणारयं. या पदांसाठी पात्र उमेदवारांना 6 सप्टेंबरपर्यंत अर्ज दाखल करायचे आहेत. वैद्यकीय अधिकारी, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी आणि स्टाफ नर्स (Staff Nurse) या पदांसाठी भरती होणार असून यामध्ये 318 जागांसाठी ही भरती होईल. या भरती प्रक्रियेचा अर्ज नेमका कुठे आणि कसा करायचा हे सविस्तरपणे जाणून घ्या.
आरोग्य विभागात विविध पदांच्या 318 जागांसाठी भरती
नाशिक महापालिकेत आरोग्य विभागात विविध पदांच्या 318 जागांसाठी भरती होणार आहे. 6 सप्टेंबरपर्यंत ही अर्ज करण्याची शेवटीची तारीख असून या भरतीमध्ये वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स अशी विविध पदांसाठी भरती आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात भरती प्रक्रिया करण्यात आली नाहीयं. यामुळे नाशिक महापालिकेच्या या 318 जागांसाठी 2000 पेक्षाही अधिक अर्ज येण्याची शक्यता वर्तवली जातंय.
विविध पदांसाठी 6 सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येणार
318 जागांसाठी होणाऱ्या भरतीसाठी 6 सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहेत. या भरती प्रक्रियेमध्ये अर्ज आॅनलाईन पध्दतीने करता येणार आहे. भरती प्रक्रियेतील अर्ज पाठवण्यासाठी जिल्हा रुग्णालय त्र्यंबकरोड हा पत्ता देण्यात आलायं. 6 सप्टेंबरनंतर महापालिका प्रशासनाकडून अर्जाची छानणी केली जाईल. त्यानंतर पात्र उमेदवारांची एक यादी प्रशासनाकडून प्रसिध्द केली जाणार आणि नंतर परीक्षा होऊन मेरिट लिस्टप्रमाणे भरती उमेदवार भरती केले जातील अशी माहिती मिळते आहे.