नाशिक महापालिकेचा अजब तर्क, तिसऱ्या लाटेत 17 हजार मृत्यूचा अंदाज, 3 कोटींचं टेंडर, चौफेर टीकेनंतर सारवासारव

कोरोनामुळं मृत्यू (Corona Deaths)होणाऱ्या लोकांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी 3 कोटी 29 लाख रुपयांचे टेंडर काढण्यात आले आहे.

नाशिक महापालिकेचा अजब तर्क, तिसऱ्या लाटेत 17 हजार मृत्यूचा अंदाज, 3 कोटींचं टेंडर, चौफेर टीकेनंतर सारवासारव
Nashik Municipal Corporation.
Follow us
| Updated on: Jan 16, 2022 | 6:36 AM

नाशिक : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत (Corona Third Wave) 17 हजार जणांचा मृत्यू होणार असल्याचा अंदाज गृहीत धरून मनपा प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आलाय. कोरोनामुळं मृत्यू (Corona Deaths)होणाऱ्या लोकांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी 3 कोटी 29 लाख रुपयांचे टेंडर काढण्यात आले आहे. मात्र, प्रशासनाने कोणत्या आधारावर मृत्यूचा आकडा पकडला ? असा प्रश्न उपस्थित करत, या अनोख्या टेंडरची चौकशी करण्याची विरोधी पक्ष शिवसेनेकडून (Shivsena) मागणी केली आहे

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत 17 हजार मृत्यू होण्याचा अंदाज

कोरोनाच्या तिसर्‍या लाटेत 17 हजार नागरिकांचा मृत्यू होईल, अशी भविष्यवाणी इतर कोणी नाही तर चक्क नाशिक मनपा प्रशासनाकडून करण्यात आलीय. मागच्या काही वर्षांपासून मयत झालेल्या लोकांवर मोफत अंत्यसंस्कार करण्याचे काम मनपा प्रशासनाकडून केल जात आहे. याच धर्तीवर या तिसर्‍या लाटेत 17 हजार नागरिकांचा मृत्यू होईल असा अंदाज बांधत ,मयत होणाऱ्या या लोकांवर मोफत अंत्यसंस्कार करण्यासाठी तब्बल तीन कोटी 29 लाख रुपयांच्या टेंडर ला मंजुरी देण्यात आली आहे, अशी माहिती देण्यात आली आहे. नाशिक महापालिकेचे घनकचरा व्यवस्थापन अधिकारी आवेश पलोड यांनी या संदर्भात माहिती दिली आहे.

टेंडरची चौकशी करा, शिवसेनेची मागणी

मागच्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या या कोरोना महामारी काळात चार हजार लोकांचा मृत्यू झाल्याची नोंद प्रशासनाकडे आहे. तिसर्‍या लाटेत 17 हजार लोकांचा मृत्यू कसा होईल, असा प्रश्न उपस्थित करत या टेंडरची चौकशी करण्याची मागणी विरोधी पक्षाकडून केला जातोय. शिवसेना महानगरप्रमुख तथा मनपा नगरेसवक सुधाकर बडगुजर यांनी ही मागणी केलीय.

तीन वर्षांसाठी प्रस्ताव

दुसरीकडे हा प्रस्ताव तीन वर्षासाठी असल्याचं मनपा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. मागच्या वर्षी कोरोना काळात मोठ्या प्रमाणात मृत्यू झाल्याने त्या वेळेस अंत्यसंस्कार करण्यासाठी निधी कमी पडला होता. त्यामुळे पूर्वतयारी म्हणून हे टेंडर देण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

इतर बातम्या :

Corona, Omicron Cases Maharashtra LIVE: राष्ट्रवादीचे माजी आमदार अमरसिंह पंडित कोरोना पॉझिटिव्ह

Tecno च्या बजेट फोनची आजपासून विक्री, JioPhone Next ला टक्कर

Nashik Municipal Corporation predicted 17 thousand deaths in Corona Third Wave and gave contract of 3 crore

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.