Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नाशिक महापालिकेचं 2759 कोटींचं बजेट सादर, निवडणुकीच्या तोंडावर विकासकामांवर भर

नाशिक महापालिकेच 2759 कोटी रुपयांंचं बजेट सादर करण्यात आलं आहे. बजेटमध्ये विकासकामांवर जोर देण्यात आलाय. Nashik Municipal Corporation budget

नाशिक महापालिकेचं 2759  कोटींचं बजेट सादर, निवडणुकीच्या तोंडावर विकासकामांवर भर
Follow us
| Updated on: May 31, 2021 | 5:56 PM

नाशिक: नाशिक महापालिकेचं आज 2021/22 या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक सादर करण्यात आले. स्थायी समिती सभापती गणेश गीते यांनी 2759 कोटींचे अंदाजपत्रक महासभेवर सादर केले. नाशिक महापालिकेने उत्पन्न वाढीवर जोर आणि विकासकामांवर भर दिला आहे. उत्पन्न वाढीसाठी विशेष योजना आणण्यावर भर तर आगामी महापालिका निवडणुकांच्या तोंडावर भाजपाचा विकास कामांवर जोर असल्याचं बोललं जात आहे. (Nashik Municipal Corporation Standing Committee approve budget for 2021-22 )

300 कोटींची वाढ करत अंदाज पत्रक

नाशिक महापालिकेचे आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सुचवलेल्या 2400 कोटींच्या तरतुदींमध्ये स्थायी समितीने वाढ केली. स्थायी समितीनं अंदाजपत्रक 2759 कोटींवर नेले आहे. त्यात मूलभूत सुविधांना वाव देण्यात आला आहे, असं बोललं जात आहे.

नाशिकच्या विकासासाठी समाधानकराक बजेट

स्थायी समितीचे सभापती गणेश गीते यांनी नाशिककरांच्या विकासाससाठी चांगलं बजेट मांडल्याचं सांगितलं. मात्र, आता पुढील काळात खरच विकास होतो का ? हे पाहणं ही महत्वाचं आहे.

हॉस्पिटल उभारणी ऑक्सिजन प्लांटवर भर असल्याची माहिती

नाशिक महापालिकेचे 2759 कोटींचे अंदाजपत्रक महासभेत मंजूर केलं आहे. स्थायी समितीं अंदाजपत्रकात यंदा 300 कोटींची वाढ केल्याचं पाहायला मिळाले. पंचवटी,सिडको,सातपूर भागात 100 खाटांचे हॉस्पिटल उभारण्याची तरतूद करण्यात आल्याची माहिती आहे. ऑक्सिजन निर्मिती प्लांट साठी विशेष तरतूद करण्यात आली आहे. महापालिकेचं उत्पन्न वाढीसाठी विशेष योजना आणण्यावर भर देण्यात आला आहे.

निवडणुकीच्या तोंडावर विकास कामांवर जोर?

नाशिक महापालिकेची निवडणूक जवळ आल्यानं सत्ताधारी भाजपनं विकास कामांवर भर देणारं बजेट मांडलंय का? असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. नाशिकमध्ये सध्या भाजपची सत्ता असून विरोधात शिवसेना आहे.

संबंधित बातम्या:

संभाजीराजे छत्रपती मला त्यांच्या पक्षात घेणार, याबाबत मलातरी काहीही माहिती नाही : छगन भुजबळ

नाशिकमध्ये होम आयसोलेशन रद्द होणार? पालिका आयुक्तांचे संकेत; म्युकरमायकोसिसचा धोका वाढला

खासगी रुग्णालयांविरोधात नाशिकचे महापौर आक्रमक, बिलांमध्ये तफावत आढळल्यास मान्यता रद्द करण्याचा इशारा

(Nashik Municipal Corporation Standing Committee approve budget for 2021-22 )

कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा
कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा.
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं.
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली.
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल.
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना.
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया.